बर्लिन फेस्टिव्हल 2022 मध्ये 'गंगूबाई काठियावाडी'चा होणार वर्ल्ड प्रीमियर

ALIA BHATT
ALIA BHATTINSTAGRAM
Updated on

आलिया भट्ट (Alia Bhatt) अभिनीत संजय लीला भन्साळींचा (Sanjay Leela Bhansali)"गंगूबाई काठियावाडी" (Gangubai Kathiwadi) पुढील वर्षी ७२ व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Berlin International film festival) वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. निर्माते म्हणाले की, चित्रपट या एवढ्या मोठ्या महोत्सवात प्रदर्शित करण्याचा मला अभिमान वाटत आहे.

महोत्सवाच्या आयोजकांनी बुधवारी जाहीर केले की भन्साळींचा चित्रपट हा एकमेव भारतीय चित्रपट आहे जो बर्लिनले स्पेशल गालासाठी निश्चित केलेल्या चार चित्रपटांपैकी एक आहे.

बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. तो जागतिक चित्रपट समुदायासाठी एक अपरिहार्य मंच असून, 10 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2022 दरम्यान आयोजित केला जाईल.

"गंगुबाई काठियावाडी" हे एक गुन्हेगारी-नाटक आहे, जे प्रख्यात लेखक हुसेन झैदी यांच्या "मुंबईच्या माफिया क्वीन्स" या पुस्तकातील एका प्रकरणावर आधारित आहे.

1960 च्या दशकात कामाठीपुरामधील सर्वात शक्तिशाली, प्रिय आणि आदरणीय मॅडमपैकी एक असलेल्या गंगूबाईच्या शीर्षक भूमिकेत आलिया भट्ट दिसणार आहे.

ALIA BHATT
Year in Review: २०२१ मध्ये 'या' सेलिब्रिटींनी बांधली लग्नगाठ

2019 च्या "गली बॉय" (Gully Boy) नंतर, आलियाचा हा दुसरा आगामी चित्रपट बर्लिनमध्ये रिलीज होणार आहे.

2021 मध्ये चित्रपटसृष्टीत 25 वर्षे पूर्ण करणारे भन्साळी म्हणाले की, "गंगूबाई काठियावाडी,हा त्यांच्यासाठी खास चित्रपट आहे. गंगुबाई काठियावाडीची कथा माझ्या हृदयाच्या खूप जवळची आहे आणि मी आणि माझ्या टीमने दिली आहे..''

या चित्रपटात सीमा पाहवा देखील आहेत आणि अजय देवगण (Ajay Devgan) आणि हुमा कुरेशी (Huma Qureshi) यांनी कॅमिओ भूमिका केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.