Alia Bhatt Daughter News : अखेर 'राहा'चा चेहरा चाहत्यांना दिसणार? अभिनेत्रीने तिच्या मुलीबद्दल केले अनेक खुलासे

आलिया भट्टने आई झाल्यानंतरचा अनुभव नुकताच एका मुलाखतीत शेअर केला.
Alia Bhatt
Alia BhattSakal
Updated on

Alia Bhatt News : आलिया भट्ट सध्या खूप व्यस्त आहे. एकीकडे ती प्रेग्नेंसीनंतर तिचे प्रोफेशनल लाइफ पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे अभिनेत्री मुलगी राहासोबत खूप वेळ घालवत आहे. आलिया आणि रणबीरने आपली मुलगी राहाचा चेहरा आतापर्यंत जगापासून लपवून ठेवला आहे.

अशा परिस्थितीत बेबी राहाचा चेहरा पाहण्यासाठी आलिया आणि रणबीरच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आलिया आणि रणबीर राहाचा चेहरा सर्वांना कधी दाखवतील या क्षणाची ते आतुरतेने वाट पाहत आहेत.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर त्यांच्या लाडक्या राहाविषयी खूप पझेसिव्ह आहेत. या जोडप्याने त्यांच्या गोपनीयतेची पूर्ण काळजी घेतली आहे आणि अलीकडेच खुलासा केला आहे की ते लवकरच तिचे कोणतेही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणार नाहीत.

आलियाने एका मुलाखतीत सांगितले की, 'रणबीर आणि मी खूप क्लियर आहोत की आम्ही लवकर राहाचा चेहरा लोकांना दाखवणार नाही. आम्ही तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणार नाही. सध्या मला माझ्या लहान मुलीबद्दल बोलणे कम्फरटेबल वाटत नाही'

Alia Bhatt
Filmfare Awards: आलियापासून जान्हवी कपूरपर्यंत बॉलीवूडच्या सौंदर्यवतींनी रेड कार्पेटवर दाखवला जलवा

आपला मुद्दा पुढे नेत आलिया म्हणाली, 'अनेक शुभेच्छा, अनेक आशीर्वाद मिळाले आहेत. मला नेहमीच राहाची मम्मी म्हटले जाते, जे मला खूप आवडते आणि खूप गोड वाटते. पण आता मी ठीक आहे. पण मी ज्यांच्यावर प्रेम करते, त्यांच्याबाबत मी फार प्रोटेक्टिव्ह आहे.खरंच मला असे वाटते की बाळाने पब्लिक पर्सनॅलिटी व्हायची काही गरज नाही. हे माझे वैयक्तिक मत आहे”,

मात्र, आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने राहाचा चेहरा न दाखवण्याची शपथ घेतली आहे, असे नाही. त्याच मुलाखतीत आलियाने शेअर केले की, 'आम्ही प्रत्येक दिवस जसा येईल तसा घालवतो. आम्हांलाही चाहत्यांच्या नजरेत सामान्य माणसासारखं जगण्याचा अधिकार आहे आणि असं नाही की आम्ही बोलत आहोत तिला कधी कोणी पाहू शकत नाही. हे आत्तासाठी आहे आणि बहुतेक लोक आमच्या निर्णयाचा खूप आदर करतात.'

आलिया तिचा वाढदिवस साजरा करून लंडनहून परत आल्यावर पापाराझींनी राहाचे एकही फोटो क्लिक केले नाही, हे देखील अभिनेत्रीने उघड केले. ती म्हणाली, पापाराझी हे माझ्या प्रोफेशनल फॅमिलीसारखे आहेत आणि त्यांचा खूप आदर केला जातो. गेल्या महिन्यात मी लंडनहून परत आले तेव्हा त्या सर्वांनी लगेच विमानतळावर आपले कॅमेरे खाली ठेवले. राहाचा एकही फोटो काढला नाही.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.