Alibaba Aani Chalishitale Chor marathi movie song : मराठी चित्रपट विश्वामध्ये आणखी एका चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचे नाव अलीबाबा आणि चाळीशीतले चोर असे आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठी प्रेक्षक, नेटकऱ्यांमध्ये या चित्रपटाची चर्चा आहे. त्यातील पहिलं गाणं हे प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून त्याला चाहत्यांचा जोरदार प्रतिसादही मिळाला आहे.
यंदाचं वर्ष हे देखील मराठी चित्रपटांसाठी लाभदायी ठरताना दिसत आहे. येत्या काही दिवसांत वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट हे चाहत्यांच्या चर्चेचा आणि कौतुकाचा विषय आहे महिला दिनाच्या औचित्यानं आणखी काही मराठी चित्रपटांची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे येत्या वर्षात प्रेक्षकांना दर्जेदार चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे.
नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि मृद्गंध फिल्म्स एल. एल. पी. निर्मित 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर’ या चित्रपटातील पहिले 'साला कॅरेक्टर' हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. शाल्मली खोलगडेच्या जबरदस्त आवाजात गायलेल्या या गाण्याला वैभव जोशी यांनी शब्दबद्ध केले असून अजित परब यांचे अफलातून संगीत लाभले आहे. मस्तीने भरलेल्या या गाण्यात 'चाळीशी'तील मित्रमैत्रिणींचे गेटटूगेदर दिसत आहे. सुबोध भावे, मुक्ता बर्वे, उमेश कामत, श्रृती मराठे, अतुल परचुरे, मधुरा वेलणकर आणि आंनद इंगळे यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे गाणे अतिशय धमाल आहे.
चाळीशी हा आयुष्यातला असा गंमतशीर टप्पा आहे, जिथे तुम्ही तरुणही नसता आणि प्रौढही. त्यामुळे या वयातील धमाल ही विशेष वेगळी असते. ही धमाल, मजामस्ती या गाण्यात दाखवण्यात आली आहे. विवेक बेळे लिखित या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर, संदीप देशपांडे निर्माते आहेत. हे 'चाळीशी'तील चोर येत्या २९ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
गाण्याबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, '' 'साला कॅरेक्टर' हे गाणं करताना ते सर्व वयोगटातल्या लोकांना सहज गुणगुणता यावं आणि नाचता यावं असा विचार होता ज्याला अजित परब आणि वैभव जोशी या दोन्ही अवलियांनी पुरेपूर न्याय दिला आहे.गाण्यावरून चित्रपटात काय धमाल येईल, याचा अंदाज तुम्ही बांधूच शकता.''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.