परमेश्वराशिवाय जगात पानही हलत नसेल तर रोज होणारे खून, बलात्कार परमेश्वर का थांबवत नाही? जावेद अख्तरांचा थेट सवाल

जगातील सर्व धर्मांनी महिलांवर अन्याय केला आहे.
Lyricist Javed Akhtar Nastik Parishad Sangli
Lyricist Javed Akhtar Nastik Parishad Sangli esakal
Updated on
Summary

चांद्रयान मोहिमेतील शास्त्रज्ञ देवाला जातात, याचा गौरव केला जातो. मग त्यांना कोणी हे विचारले नाही की चंद्रावर गेल्यावर त्यांना चांद्रलोक दिसला का?

सांगली : ‘‘संस्कृती आणि धर्म या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. धर्मांनी (Religion) संस्कृतीतील अनेक सण-संस्कार ‘हायजॅक’ केले आणि समाजावर ताबा मिळवला. धर्माच्या नावाखाली जगभरात हिंसा होत आहे. जगातील सर्व धर्मांनी महिलांवर अन्याय केला आहे. त्यामुळे धर्माचे अस्तित्व अंतिमतः स्त्रियांना जोखडात ठेवणारेच ठरेल,’’ असे मत प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (Lyricist Javed Akhtar) यांनी व्यक्त केले.

ब्राईट सोसायटीतर्फे मंगळवारी आयोजित दहाव्या नास्तिक परिषदेत ते बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत तुषार गांधी (Tushar Gandhi) यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन झाले. व्यासपीठावर ब्राईट सोसायटीचे सचिव कुमार नागे, अध्यक्ष प्रमोद सहस्रबुद्धे आदी होते.

Lyricist Javed Akhtar Nastik Parishad Sangli
Maratha Reservation : घटनादुरुस्तीशिवाय मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, हे तितकंच खरं; शाहू छत्रपती महाराजांचं मोठं विधान

अख्तर म्हणाले, ‘‘भारतात चार हजार वर्षांपूर्वी चार्वाकांनी धर्माच्या विरोधातील लढाई सुरू केली होती. धर्मामुळे, देवामुळे आम्हाला शांती मिळते, असे धार्मिक लोक म्हणतात. मात्र त्याचा अतिरेक झाल्यानंतर हिंसा सुरू होते. असा धर्म काय कामाचा? लहानपणापासूनच धार्मिक संस्कार केले जातात. त्यामुळे मोठेपणी त्यांच्यामध्ये धार्मिकता रुजलेली असते.

Lyricist Javed Akhtar Nastik Parishad Sangli
संतापजनक! पोलिसानं स्वतःच्या चार महिन्याच्या बाळाला रस्त्यावर आपटलं; क्षणात चिमुरड्याचा जागीच दुर्दैवी अंत, असं काय घडलं?

तेव्हा वयाच्या १८ वर्षांपर्यंत मुलाला धर्माबद्दल काहीही सांगू नका. त्यानंतर कोणता धर्म स्वीकारायचा, हे त्या मुलाला ठरवू दे. मात्र त्यावेळी तो कोणताच धर्म स्वीकारणार नाही, याची मला खात्री आहे. श्रद्धा ही आंधळीच असते. श्रद्धेमध्ये पुरावा, तर्काला स्थान नाही. त्यामुळे अंधश्रद्धेचा गैरफायदा त्या-त्या धर्मातील नेते उठवतात. धर्मात असलेल्या अतार्किक गोष्टी स्वीकारल्याने लोक विचार करू शकत नाहीत, असे त्यांनी सांगितले.

Lyricist Javed Akhtar Nastik Parishad Sangli
Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजेंचं मोठं विधान; म्हणाले, 'मागासलेपण सिद्ध झाल्याशिवाय पुढं..'

‘प्रसारमाध्यमांतून समाजप्रबोधनाच्या अपेक्षा नाही’

खासदार कुमार केतकर म्हणाले, ‘नास्तिक बनणे ही प्रक्रिया आहे. आपण नकारात्मक नास्तिकता स्वीकारतो. मात्र अशी नास्तिकता आस्तिकतेची ‘मिरर इमेज’च असते. प्रसारमाध्यंमातून नास्तिकेचा प्रचार होत नाही. मात्र, धर्माची मांडणी आपुसकपणे केली जाते. आपली सर्व माध्यमे अर्थकारणासाठी चालवली जातात. त्यामुळे त्यांच्याकडून समाजप्रबोधनाच्या अपेक्षा ठेवू नका.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.