Allu Arjun चा अमेरिकेत डंका, 'इंडिया डे परेड'मध्ये ग्रँड एंट्री

अल्लू अर्जुनचं अमेरिकेत जय जयकार
Allu Arjun
Allu Arjun esakal
Updated on

Allu Arjun At India Day Parade : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन न्यूयॉर्कमध्ये 'इंडिया डे परेड'मध्ये सहभागी झाला. या परेड इव्हेंटमध्ये त्याने ग्रॅंड एंट्री केली. अल्लू अर्जुनला न्यूयॉर्कमधील वार्षिक इंडियन डे परेडमध्ये ग्रँड मार्शल म्हणून देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

Allu Arjun
Ranveer Singh : मुदतवाढ द्या, रणवीरची न्यूड फोटोशूट प्रकरणी पोलिसांकडे मागणी

'ग्रँड मार्शल' या पदवीने सन्मानित

परदेशात देशाच्या सन्मानार्थ आयोजित या कार्यक्रमात अल्लू हा पत्नी स्नेहा रेड्डीसह परेडमध्ये सहभागी झाला होता. येथे अभिनेत्याला 'ग्रँड मार्शल' ही पदवी प्रदान करण्यात आली. या परेडमध्ये भारताचा झेंडा फडकावत अल्लूने चाहत्यांसाठी एक व्हिडिओही शेअर केला आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये अल्लूने लिहिले की, 'न्यूयॉर्कमधील 'इंडिया डे परेड'मध्ये (Bollywood News) ग्रँड मार्शल बनणे सन्मानाची गोष्ट होती.

अभिनेत्याने त्याचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुन (Allu Arjun) पांढरे कपडे परिधान केलेला दिसत आहे. व्हिडीओमध्ये तो पत्नीसोबत मोकळ्या कारमध्ये परेडमध्ये सहभागी होताच चाहते जल्लोष करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये, त्याचे चाहते त्यांच्या स्टारसाठी जल्लोष करताना आणि स्टारचे फोटो क्लिक करताना दिसत आहे.

Allu Arjun
विजय देवरकोंडा बुरखा घालून थिएटरमध्ये... अभिनेत्यानं सांगितला मजेदार किस्सा

न्यूयॉर्कमधील चाहते

अल्लू अर्जुन हा भारतातील सर्वात मोठ्या चित्रपट अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचा 'पुष्पा: द राइज' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला, ज्याने जगभरात ३०० कोटींची कमाई केली. फॅन पेजवर शेअर केलेल्या काही व्हिडिओंमध्ये अल्लू न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये एलईडी स्क्रीनवर दिसत आहे.

त्याच्या चाहत्यांनी, ज्यांपैकी बरेच जण पारंपारिक भारतीय पोशाख परिधान केले होते. त्यांनी पडद्यावर अभिनेत्याचा जयजयकार केला. यापूर्वी १९ ऑगस्ट रोजी अल्लू आणि स्नेहा परेडच्या आधी न्यूयॉर्क विमानतळावर दिसले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.