Pushpa Allu Arjun: अल्लु अर्जुनच्या पुष्पानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याचा पुष्पा द राईज नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं बॉलीवूडच्या चित्रपटांना पाणी पाजले होते. पुष्पाचा प्रभाव एवढा जबरदस्त होता की, त्याच्यापुढे कोणताही चित्रपट मोठी कामगिरी करु शकला नाही. आता पुष्पाच्या दुसऱ्या भागाचे प्रेक्षकांना वेध लागले आहेत. अल्लु अर्जुन हा त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे.
वीस वर्षानंतर पहिल्यांदाच एका पुरस्कार सोहळ्यात आपलं मनोगत व्यक्त करताना अल्लुच्या डोळ्यात पाणी होतं. त्याच्या त्या मनोगताला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. उत्तररेकडील एका पुरस्कार सोहळ्यात त्यानं सहभागी घेतला होता. त्याचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला आहे. यावेळी अल्लु अर्जुनचा तो भावूक चेहरा चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा विषय ठरला आहे. असं अर्जुन काय म्हणाला हे आपण जाणून घेणार आहोत. दिल्लीमध्ये अल्लुला इंडियन ऑफ द इयर 2022 या पुरस्कारानं गौरविण्यात आले.
यावेळी त्या पुरस्काराला उत्तर देताना तो कमालीचा भावूक झाला. वीस वर्षांच्या करिअरमध्ये आपल्याला पहिल्यांदाच उत्तरेकडील एका संस्थेनं पुरस्कार देऊन गौरविले याचा मनस्वी आनंद झाला. त्यामुळे पुष्पाच्या डोळ्यात पाणी आले. तो म्हणाला, गेल्या वीस वर्षांपासून मी फिल्म उद्योगात काम करतो आहे. मला दक्षिण भारतामध्ये खूप पुरस्कार मिळाले. पण पहिल्यांदाच उत्तर भारतामध्ये पुरस्कार मिळतो आहे याचा खास आनंद आहे.
आपल्यात जे काही वाद आहे, विचारात भेद आहे तो यानिमित्तानं कमी होण्यास मदत होईल असे मला वाटते. तुम्हाला माहिती आहे की, आपल्या देशाची विविधता किती सुंदर आहे. आपण त्यातून नेहमी काही ना काही शिकण्याची गरज आहे. जेव्हा पुष्पा तयार झाला तेव्हा साऱ्या देशानं त्याचा आनंद साजरा केला होता. त्यामुळे आपण सर्व फिल्म उद्योगाची मुलं आहोत हे लक्षात घेण्याची गरज आहे. याप्रसंगी पुष्पानं इंडिया कभी झुकेगा नही...असे म्हणून उपस्थितांची मनं जिंकून घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.