Allu Arjun Pushpa 2 Fees: गेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जुन त्याच्या आगामी सिनेमा 'पुष्पा 2' साठी चर्चेत आहे. या चित्रपटाचा पहिला भाग ‘पुष्पा: द राइज’ने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता.
चित्रपटातील पुष्पाची शैली, चित्रपटातील गाणी आणि संवाद, सर्व काही सुपरहिट ठरलं. इतकच नाही तर 'पुष्पा'साठी अल्लूला यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीतील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला आहे.
अशा परिस्थितीत आता निर्माते लवकरच 'पुष्पा 2' चित्रपट आणण्याच्या तयारीत आहेत. या चित्रपटाचे पोस्टर देखील रिलिज करण्यात आले आहे. दरम्यान, आता या चित्रपटाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.
पुष्पाचा पहिला भाग हिट झाल्यानंतर अल्लू अर्जुनने त्याची फी वाढवली असल्याच्या बातम्या चर्तेत होत्या. मात्र आता अल्लू अर्जुनने या चित्रपटासाठी किती फी घेतली आहे याबाबत एक अपडेट समोर आले आहे.
रिपोर्ट्सनुसार अल्लू अर्जुनने 'पुष्पा 2'साठी कोणतीही फी घेतलेली नाही. तो या चित्रपटात फ्रिमध्ये काम करणार आहे. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तो कोट्यवधींची कमाई करणार आहेत.
चित्रपटासाठी कोणतीही फी घेण्याऐवजी अल्लूने आता चित्रपटाच्या एकूण नफ्यातील 33 टक्के हिस्सा मागितला आहे. या नफ्यात बॉक्स ऑफिस कलेक्शनसोबत डिजिटल आणि सॅटेलाइट राईटचे पैसे देखील त्याला मिळणार आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
केवळ भारतातच नाही तर परदेशातील चित्रपटगृहांमध्ये 'पुष्पा 2' हिट होणार अशी आशा निर्मात्यांना आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, Amazon Prime Video ने 'पुष्पा' चे OTT अधिकार विकत घेतले आहे. प्राइमने या चित्रपटाचे हक्क 30 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. तर 'पुष्पा 2' चे हक्क नेटफ्लिक्सकडे आहेत. 'पुष्पा 2' ची OTT डील 90 कोटींमध्ये झाल्याची चर्चा आहे.
'पुष्पा २' पुढच्या वर्षी 15 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलिज होणार आहेत. कलाकरांबद्दल बोलायचं असेल तर अल्लूसोबत फहद फासिल, रश्मिका मंदान्ना, सुनील, प्रकाश राज आणि जगपती बाबू हे स्टार्स दिसणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.