Aman Gupta News: टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये सध्या जो रियॅलिटी शो कमालीचा लोकप्रिय आहे त्या शार्क टँकनं प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे. या मालिकेच्या (Shak Tank 3) वेगवेगळ्या सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. त्यातील परिक्षक हे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत राहिले आहेत. त्यातील एक अमन गुप्ता हा त्याच्या (Aman Gupta Latest News) प्रतिक्रियेमुळे लाईमलाईटमध्ये आहे.
शार्क टँकच्या सुरु असणाऱ्या तिसऱ्या सीझनविषयी अमननं त्याला मनोरंजन (Shark Tank 3) विश्वातील एका प्रसिद्ध सेलिब्रेटीनं त्याला दिलेल्या त्या सल्ल्याविषयी सांगितलं आहे. अमननं त्याचं नाव सांगत त्याला दिलेलं उत्तरही सांगितलं आहे. एका मुलाखतीमध्ये अमननं तो किस्सा सांगितला आहे. बोट कंपनीचे संस्थापक, मालक असणाऱ्या अमनचा सोशल मीडियावर चाहतावर्ग मोठा आहे. शार्क टँकमधूनही त्यानं कमालीची लोकुप्रियता मिळवली आहे.
आपल्या आगळ्या वेगळ्या आणि रोखठोक शैलीसाठी अमन हा नेहमीच शार्क टँकचा महत्वाचा भाग राहिला आहे. आता त्यानं त्याला एका सेलिब्रेटीनं दिलेल्या सल्ल्याबाबत सांगितलं आहे. अमननं त्या शो मध्ये बऱ्याचशा स्टार्ट अपला नकार दिला आहे. त्यामुळे तो ट्रोल झाला आहे. कधी काळी ज्याची प्रधानमंत्री मोदी यांनी प्रशंसा केली होती त्या अमनला ट्रोल व्हावे लागले आहे.
अमननं ई टाईम्सशी बातचीत करताना सांगितलं की, मला एकदा प्रख्यात रॅपर बादशहानं शार्क टँकचा सीझन २ करु नको असा सल्ला दिला होता. माझी एकदा त्याच्याशी भेट झाली होती. मी त्याला म्हणालो, भाई मला आजकाल खूप ताण येतो आहे, लोकं भेटायला येतात, त्यांना खूप काही बोलायचे असते. तेव्हा तो मला म्हणाला, तुला एवढा त्रास होत असेल तर दुसरा सीझन करु नकोस.
आपल्याला सातत्यानं होणाऱ्या ट्रोलिंगविषयी अमन म्हणाला, जेव्हा पहिल्या सीझनमध्ये लोकं बोलू लागली तेव्हा मला वाटले आपण जरा आपल्यात काही सुधारणा करायला हवी. मात्र आता लोकं सारखीच बोलत असतील तर मग मला असे वाटते की, भारतात टाळ्या अन् शिव्या एकाचवेळी पडतात. असे म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.