Gandhi Godse Ek Yudh: नथुरामला खलनायक दाखवल्यास.. हिंदू महासभेचा इशारा..

'गांधी गोडसे - एक युद्ध' चित्रपटावरुन वाद पेटणार..
amar hutatma hindu mahasabha oppose and gives warning on gandhi godse ek yudh movie
amar hutatma hindu mahasabha oppose and gives warning on gandhi godse ek yudh moviesakal
Updated on

gandhi godse ek yudh: सध्या बॉलीवुडमध्ये चर्चा आहे ती, राजकुमार संतोषी दिग्दर्शित 'गांधी गोडसे - एक युद्ध' या सिनेमाची. महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे हे दोन विषय जेव्हा जेव्हा समोर आले आहेत तेव्हा वाद, चर्चा होणे अटळ असते. गांधींच्या मारेकऱ्याची ही गोष्ट राजकुमार संतोषी मोठ्या पडद्यावर साकारणार आहेत. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, या निमित्ताने आता रोज नवा वाद समोर येत आहे.

(amar hutatma hindu mahasabha oppose and gives warning on gandhi godse ek yudh movie)

'गांधी गोडसे - एक युद्ध' हा चित्रपट २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटावरुन गांधी वादी आणि कट्टर हिंदुत्ववादी चांगलेच भडकले आहेत. गांधींना चुकीचं दाखवू नका असा रेटा गांधीवादी धरतायत तर नथुरामला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाल्यास चित्रपट बंद पाडू असा इशारा कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे.

हेही वाचा : जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं 'लिव्हिंग विल'

amar hutatma hindu mahasabha oppose and gives warning on gandhi godse ek yudh movie
Gandhi Godse Ek Yudh : गोडसे काही सुपारी किलर नव्हता.. 'गांधी-गोडसे'चे दिग्दर्शकाचं मोठं विधान..

याबाबत अमर हुतात्मा हिंदू महासभेने नुकताच विरोध दर्शवला. नथुराम गोडसेला चुकीचे दाखवल्यास चित्रपटगृहांसमोर निदर्शने करून चित्रपट बंद पाडण्यात येईल, असा इशारा अमर हुतात्मा हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी दिला आहे, तसे त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

नाथूरामांची बाजू योग्य पद्धतीने मांडल्यास चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. काळे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनानुसार, या चित्रपटात गांधी व गोडसे यांची बाजू या संदर्भातील खटल्यातील न्यायालयीन तपशीलानुसार मांडली आहे.

नथुरामच्या निवेदनाशी छेडछाड करून त्यांना ‘खलनायक’ म्हणून दाखविले गेल्यास ‘अमर हुतात्मा हिंदू महासभा’ या चित्रपटाचा तीव्र विरोध करेल व चित्रपटगृहांसमोर निदर्शने करून चित्रपट बंद पाडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.