आसाम वासीयांच्या मदतीला बॉलीवूड धावलं,'या' कलाकारांनी केली लाखोंची मदत..

आसाम येथे आलेल्या महापूरात मोठी हानी झाली असून त्यांच्या मदतीसाठी बॉलीवुड कलाकार सरसावले आहेत.
amir khan, arjun kapoor and many bollywood celebrities gave economic help for assam floods
amir khan, arjun kapoor and many bollywood celebrities gave economic help for assam floodssakal
Updated on

Assam Floods : गेली दोन आठवडे आसाम एका भयाण संकटात आहे. ईशान्य भारताच्या इतिहासातील सर्वात भीषण पूराशी सध्या आसामवासीय संघर्ष करत आहेत. या पूराचा फटका बसलेल्या नागरिकांचे काळीज पिळवटून टाकणारे फोटो आता समोर येत आहेत. जवळपास २१ लाख आसाम वासीय या पुरात अडकले तर १३० हून अधिक लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागले. अनेकांची घरे उदध्वस्त झाली. त्यामुळे आसामला सध्या मदतीची नितांत गरज आहे. देशभरातून हा मदतीचा ओघ सुरू आहे. त्यात आता बॉलीवुडनेही आपला मदतीचा हात पुढे केला आहे.

amir khan, arjun kapoor and many bollywood celebrities gave economic help for assam floods
'एकदा काय झालं..' सुमीत राघवनची 'ती' पोस्ट चर्चेत..

अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सह अनेक कलाकारांनीही आसामसाठी देणगी दिली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन याची माहिती दिली. 'आसामला या महापूरातून सावरण्यासाठी सीएम रिलीफ फंडात बॉलिवूडच्या विविध कलाकारांनी देणगी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे . प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आमिर खान यांनी सीएम रिलीफ फंडात 25 लाखांचे योगदान दिले. त्यांनी दाखवलेल्या अस्थे प्रती आम्ही ऋणी आहोत,'असे ट्विट त्यांनी केले आहे. यासोबतच सोनू निगम, अर्जुन कपूर, दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचेही आभार त्यांनी मानले आहेत. (amir khan, arjun kapoor and many bollywood celebrities giving economic help for assam floods)

भूषण कुमार यांनीही 11 लाख, सोनू निगम, अर्जुन कपूर, रोहित शेट्टी यांनी प्रत्येकी 5 लाख तर तर अमीर खान यांनी 25 लाख रुपये मदतनिधी दिला आहे. सध्या आसाम या पुरातून सावरत आहेत. तर काही जिल्ह्यांमध्ये अजून परिस्थिती बिकट आहे. परंतु सरकारचे श्रम आणि लोकसहभाग यांच्या मदतीने लोकांपर्यंत मोठी मदत पोहोचवली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.