बिग बी अमिताभ यांच्यावर एका महिलेने केला चोरीचा आरोप

amitabh
amitabh
Updated on

मुंबई- बिग बी अमिताभ बच्चन सोशल मिडियावर नेहमीच ऍक्टीव्ह असतात. मग ते ट्विटर असो, फेसबुक, इंस्टाग्राम किंवा मग त्यांचा स्वतःचा ब्लॉग. इतर कोणाही स्टारपेक्षा बिग बी जास्त ऍक्टीव्ह असतात. त्यांच्या बिझी शेड्युलमधुन ते या माध्यमांद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी उत्सुक असतात. मात्र याच माध्यमावर एक पोस्ट केल्याने एका महिलेने थेट बिग बींवर चोरींचा आरोप केला आहे. 

बिग बी अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली. होती. त्यामध्ये त्यांनी पुढील कविता लिहिली होती. 

थोड़ा पानी रंज का उबालिये
खूब सारा दूध खुशियों का
थोड़ी पत्तियां ख्यालों की..

थोड़े गम को कूटकर बारीक,
हंसी की चीनी मिला दीजिये..
उबलने दीजिये ख्वाबों को
कुछ देर तक..!

यह जिंदगी की चाय है जनाब..
इसे तसल्ली के कप में छानकर
घूंट घूंट कर मजा लीजिये...!!  

अमिताभ बच्चन यांच्या या कवितेमुळे वाद निर्माण झाला आहे. तिशा अग्रवाल नावाच्या एका महिलेने दावा केला आहे की ही कविता तिची आहे. तिने बिग बींच्या या पोस्टखाली कमेंट करत म्हटलं आहे की या कवितेचं श्रेय तिला देण्यात यावं. तिशाने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय, ''जेव्हा अमिताभ बच्चन तुमची पोस्ट कॉपी करतात आणि श्रेय देत नाहीत अशावेळी आनंद व्यक्त करावा की रडावं''.

तिशा अग्रवालने ही कविता २४ एप्रिल २०२० ला लिहिली होती. ही कविता तिने फेसबुकवर शेअर देखील केली होती. तिशा एक कवयित्री आहे आणि अनेकदा फेसबुकवर कविता शेअर करत असते. चहाशी संबंधित अनेक पोस्ट त्यांच्या फेसबुकवर पाहायला मिळतील. 

तिशाने केलेल्या या आरोपावर आत्तापर्यंत अमिताभ यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तिशाने याबाबतील पाऊल उचलायचं म्हटलं असलं तरी ती नेमकं काय करणार आहे याबाबत माहिती मिळालेली नाही. या कवितेमुळे अनेक लोक तिशाचं समर्थन करत आहेत.    

amitabh bachchan accused of stealing poetry of tisha agarwal  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.