Amitabh anushka bike ride without helmet photos videos : बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे नेहमीच त्यांच्या हटके स्टाईलसाठी ओळखले जातात. वयाची ८० वर्षे पूर्ण केली तरी बिग बी यांच्यातील उत्साह हा जराही कमी झालेला नाही. दिवसांतले १२ ते १४ तास काम करुन ते अजुनही नवोदित सहकारी कलाकारांना आपण अजुनही तरुण आहोत दे दाखवून देतात. अमिताभ आणि अनुष्का शर्मा यांच्यावर मुंबई पोलीस कारवाई करणार असल्याची बातमी समोर आली आहे.
अनुष्का शर्मा ही जशी तिच्या अभियनासाठी प्रसिद्ध आहे तशीच ती तिच्या परखड स्वभावासाठी देखील ओळखली जाते. यापूर्वी तिला तिच्या परखड स्वभावामुळे सोशल मीडियावर ट्रोल देखील व्हावे लागले आहे. काल बिग बी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्यांना सेटवर पोहचायला उशीर झाला होता. आणि वाहतूक कोंडीमुळे ते लवकर पोहचू शकणार नव्हते. अशावेळी त्यांनी जे केले ते सोशल मीडियावर लाखो चाहत्यांनी पाहिले,
Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
बिग बी यांचा तो एका रस्त्यावरील व्यक्तीकडे लिफ्ट मागण्याचा व्हिडिओ भलताच व्हायरल झाला होता. त्यावर चाहत्यांनी त्यांचे कौतूकही केले होते. मात्र आता मुंबई पोलिसांनी अमिताभ यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे. मुंबई वाहतूक पोलिस अमिताभ बच्चन यांना हेल्मेट न घातल्याप्रकरणी दंड ठोठावणार असल्याचे बोलले जात आहे. बिग बींचा तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही नेटकऱ्यांनी त्यांच्याविरोधात सोशल मीडियावर तक्रारही केली होती.
असाच एक व्हिडिओ अनुष्का शर्माचा देखील आहे. अनुष्का ही तिच्या बॉडीगार्ड समवेत बाईक राईड करताना दिसली. दुसरीकडे अमिताभ यांनी एका दुचाकीस्वाराची मदत घेतली. मात्र या दोघांनाही वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी. अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर आल्या आहेत. त्यानंतर मुंबई पोलीस कोणती कारवाई करणार असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
अमिताभ यांचा तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका नेटकऱ्यानं तो मुंबई पोलिसांना टॅग केला आहे. त्याविषयी लिहिलं आहे की, दुचाकी चालवणारा आणि मागे बसलेला त्या दोघांनी देखील हेल्मेट घातलेलं नाही.अशावेळी मुंबई पोलिसांनी त्या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यावर अनेकांच्या प्रतिक्रियाही आल्या आहेत. मुंबई पोलिसांनी देखील त्याची दखल घेतली आहे. याची माहिती आम्ही मुंबई वाहतूक पोलिसांना दिल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.