Amitabh Bachchan Ayodhya: अमिताभ अयोध्येत बांधणार स्वतःचं घर, खरेदी केली इतक्या कोटींची जमीन

अमिताभ यांनी राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत जमीन खरेदी केलीय
Amitabh Bachchan build house in Ayodhya bought land worth 15 crores
Amitabh Bachchan build house in Ayodhya bought land worth 15 croresSAKAL
Updated on

Amitabh Bachchan Ayodhya Home News: अयोध्येत २२ तारखेला राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. देशातील सर्व नागरीक यासाठी उत्सुक आहेत. २२ तारखेला हा भव्यदिव्य सोहळा पाहण्यासाठी सगळ्यांची उत्सुकता शिगेला आहे.

अशातच बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन हे अयोध्यावासी होणार आहेत. बिग बी अयोध्येत स्वतःच्या हक्काचं घर बांधणार आहेत. यासाठी अमिताभ यांनी जमीन खरेदी केलीय. या जमिनीची किंमत कोटींच्या घरात आहे. वाचा सविस्तर.

(Amitabh Bachchan build house in Ayodhya bought land worth 15 crores)

Amitabh Bachchan build house in Ayodhya bought land worth 15 crores
Bigg Boss Tamil 7 Winner: अर्चना रविचंद्रन ठरली कमल हासनच्या 'बिग बॉस 7 तामिळ'ची विजेती

अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गजांनी शहरात आपले पैसे गुंतवण्यास सुरुवात केली आहे. बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन देखील यामध्ये सामील झाल्याचे दिसते.

अमिताभ यांनी अयोध्येत तब्बल 14.50 कोटी रुपयांचा विस्तीर्ण भूखंड खरेदी केल्याची माहिती आहे. अधिकृत कागदपत्रांनुसार, अमिताभ यांनी अयोध्येतील सरयूमध्ये जमिनीचा एक तुकडा विकत घेतला आहे. मुंबईस्थित बिल्डर्स लोढा यांनी विकसित केलेल्या प्रोजेक्टवर अमिताभ यांनी पैसे गुंतवले आहेत.

बिग बींनी खरेदी केलेली जमीन 10,000 स्क्वेअर फूट पसरली आहे. अमिताभ यांनी तब्बल 14.50 कोटी रुपये देऊन या करारावर शिक्कामोर्तब केले.

द सरयूच्या अधिकृत वेबसाइटनुसार, ही मालमत्ता रामजन्मभूमी मंदिरापासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. आणि ती पवित्र सरयू नदीच्या काठावर विकसित केली जात आहे.

बिग बी आता खरेदी केलेल्या जमिनीवर घर बांधण्यासाठी उत्सुक आहेत. एका अधिकृत निवेदनात त्यांनी नमूद केले की, "अयोध्येबद्दल त्यांच्या हृदयात विशेष स्थान आहे. अयोध्येतील अध्यात्म आणि सांस्कृतिक समृद्धी यांनी भौगोलिक सीमा ओलांडून एक भावनिक संबंध निर्माण केला आहे.

ही अयोध्येच्या आत्म्यामध्ये शिरण्याची एक सुरुवात आहे. अयोध्येत परंपरा आणि आधुनिकता अखंडपणे एकमेकांचा हात धरून आहेत. मी जागतिक आध्यात्मिक राजधानीत माझे घर बांधण्यासाठी उत्सुक आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.