अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांना अभिषेकचा(Abhishek Bachchan) नेहमीच अभिमान वाटत आलेला आहे. त्यांनी अनेकदा तसं आपल्या पोस्टच्या माध्यमातून,कधी मुलाखतींच्या माध्यमातून जाहिररित्या कबूल केलं आहे. त्या दोघांमधलं वडील-मुलाचं बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग आहे. मागेच अभिषेकविषयी त्यांनी केलेल्या एका पोस्टची मोठी चर्चा झाली होती. त्यात त्यांनी आपला 'उत्तराधिकारी' व्हायला अभिषेक कसा पात्र हे सांगताना त्याला थेट आपला उत्तराधिकारी घोषितही केलं होतं. अभिषेकनं त्याच्या 'दसवी' सिनेमाच्या माध्यमातून स्वतःला उत्तम अभिनेता म्हणून सिद्ध केलं आहे याविषयी अमिताभ यांनी भरभरुन लिहिलं होतं. त्यांनी एकप्रकारे आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरनं अभिषेकच्या 'दसवी' सिनेमाचं वेगवेगळ्या पद्धतीनं प्रमोशन केलं आहे. पण यावरनं ट्रोलर्सनी मात्र त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करायला सुरुवात केली. पण एरव्ही शांत भूमिका घेणारे अमिताभनी यावेळेस मात्र कडक शब्दात ट्रोलर्सला पलटवार केला आहे. सध्या अमिताभ दिल्लीत कामानिमित्तानं बिझी आहेत. पण यातनं वेळ काढत त्यांनी ट्रोलर्सला सुनावणारी विशेष पोस्ट ट्वीटरवरनं केली आहे,ती देखील भर मध्यरात्री.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे,''हो,महोदय,मी हे करतो: शुभेच्छा,प्रचार आणि मंगल गोष्टींचं आदान-प्रदान. तुम्ही काय करणार माझं?'' अभिषेक बच्चनचा नेटफ्लिक्स आणि जिओ वर 'दसवी' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात अभिषेकनं अशिक्षित गंगाराम चौधरी या राजकारण्याची भूमिका साकारली आहे. भ्रष्टाचार प्रकरणात अटक झालेला हा गंगाराम चौधरी जेलमध्ये गेल्यावर शिक्षण घेऊन काय चमत्कार घडवतो अशी एकंदरीत कथा या सिनेमाची आहे.
गेल्या महिन्यात अमिताभ यांनी अभिषेकचं कौतूक करणारी एक पोस्ट केली होती. ज्यात त्यांनी अभिषेकचं 'दसवी' सिनेमातील कामाविषयी कौतूक करताना तो आपला सर्वच बाबतीत उत्तराधिकारी बनण्यास पात्र आहे असं म्हटलं होतं. त्यावेळी अमिताभ यांनी आपले वडील हरिवंशराय बच्चन यांची एक कविता देखील पोस्ट केली होती. त्यांनी लिहिलं होतं,''मेरे बेटे,बेटे होने से तुम मेरे उत्तराधिकारी नही होगे. जो मेरे उत्तराधिकारी होंगे,वो मेरे बेटे होंगे- हरिवंश राय बच्चन''. अशी ती कविता त्यांनी पोस्ट केली होती. पुढे लिहिलं होतं,''अभिषेक तु माझा उत्तराधिकारी असशील,बस सांगितलं तर सांगितलं''.
त्यावर अभिषेकने देखील वडीलांच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना लिहिलं होतं,''लव्ह यू पाप. तुम्ही नेहमीच मला प्रोत्साहन आणि ऊर्जा देता. मला प्रेरित करता''. 'दसवी' सिनेमात अभिषेक बच्चननसोबत यामी गौतम,निमरत कौर या देखील महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.