Amitabh Bachchan Post: ऐतिहासिक कामगिरीबद्दल रिले संघाचे अभिनंदन करतांना अमिताभ बच्चन यांचा संताप का?

Amitabh Bachchan Post:
Amitabh Bachchan Post:Esakal
Updated on

Amitabh Bachchan Post: भारताच्या पुरुषांच्या 4x400 रिले संघाने कमाल केली. जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरून त्यांनी इतिहास रचला. भारतीय संघ प्रथमच अंतिम फेरीत धडक मारण्यात यशस्वी ठरला. भारतीय संघाने 2 मिनिटे 59.05 सेकंदात शर्यत पूर्ण केली, जी कोणत्याही आशियाई संघापेक्षा जास्त होती. यावेळी भारताच्या संघात मोहम्मद अजमल, राजेश रमेश, अमोज जेकब आणि मोहम्मद अनस याहिया यांचा समावेश होता.

Amitabh Bachchan Post:
Kishor Kadam: "अरे लूट थांबवा रे ही ..", मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे टोलवर कवी सौमित्र यांची संतप्त पोस्ट

या विजयानंतर भारताच्या संघावर अनेकांनी अभिनंदनचा वर्षाव केला. त्यातच अमिताभ बच्चन यांनी देखील पोस्ट शेयर करत संघाचे अभिनंदन केले. अमिताभ बच्चन यांना चित्रपटांबरोबरच खेळाचीही प्रचंड आवड आहे. बिग बींनी यासंबंधीची एक पोस्ट शेअर अभिनंदन तर केले मात्र त्याचसोबतच नाराजीही व्यक्त केली.

या विजयानंतर भारताच्या संघावर अनेकांनी अभिनंदनचा वर्षाव केला. त्यातच अमिताभ बच्चन यांनी देखील पोस्ट शेयर करत संघाचे अभिनंदन केले. अमिताभ बच्चन यांना चित्रपटांबरोबरच खेळाचीही प्रचंड आवड आहे. बिग बींनी यासंबंधीची एक पोस्ट शेअर अभिनंदन तर केले मात्र त्याचसोबतच नाराजीही व्यक्त केली.

Amitabh Bachchan Post:
Ajinkya Deo: राहिल्या फक्त आठवणी... दोन ओळींमध्ये अजिंक्य देवने सीमा - रमेश देव यांची आठवण मनातलं दुःख मांडलं

अमिताभ बच्चन यांनी उद्योगपती आनंद महिंद्रा यांचे एक ट्विट रिशेअर केले आहे. आनंद महिंद्रा यांनी या ट्विटमध्ये जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचलेल्या भारतीय तरुणांचे कौतुक केलं. त्याची हिच पोस्ट बिग बींनी शेयर केली आणि खेळाडूंचे अभिनंदन केले.

ते पोस्टमध्ये लिहितात, "आणि भारत.. जय हिंद. जगभरातून भारताचे अभिनंदन.. आणि फक्त कॉमेंट्री ऐकली.. भारतीय संघासाठी एक शब्दही नाही.. फक्त तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकाबद्दल बोलले जात होते.. आम्ही दुसऱ्या क्रमांकावर असताना. क्वालिफायर्सच्या अगदी जवळ येत आहेत.." आता बिग बींची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनेकांनी त्यांच्या पोस्टला सहमती दर्शवली आहे.

Amitabh Bachchan Post:
Malaika - Arjun: "ह्यांचं सगळं ओक्केमध्ये एकदम!" ब्रेकअपच्या चर्चानंतर मलायका - अर्जुन भर पावसात एकत्र जेवायला, व्हिडीओ व्हायरल

भारताने रिले शर्यतीत सर्वांना पराभूत केले आणि रिले 2:59:05 यावेळेत मध्ये पूर्ण केली आणि दुसरे स्थान मिळवले. तर यूएसए 2:58:47 च्या वेळेसह प्रथम स्थानावर आहे. सर्वच स्तरावरुन भारताचे कौतुक होत आहे.

अमिताभ बच्चन यांच्या कामबद्दल बोलायचं झालं त्यांना खेळातही खुप रस आहे. त्यांनी खेळावर आधारित झुंड आणि घुमर असे चित्रपटही प्रदर्शित झाले आहेत

बिग बी सध्या कल्की 2898 एडी, गणपत, द उमेश क्रॉनिकल्स आणि बटरफ्लाय या चित्रपटांचा भाग आहेत. याशिवाय ते आता शाहरुख खानसोबत दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.