Amitabh Bachchan Diet: चहा,कॉफी पीत नाहीत, रोज प्राणायम अन् बरंच काही.. वाचा शहंशाहचं डाएट सीक्रेट

वयाच्या ८० व्या वर्षीही दिवसाचे अनेक तास कामात व्यस्त असणारे अमिताभ बच्चन खूप काटेकोरपणे आपलं डाएट पाळतात.
Amitabh Bachchan Diet secret,
Amitabh Bachchan Diet secret,Google
Updated on

Amitabh Bachchan Diet Secret: ११ ऑक्टोबर हा दिवस सिने चाहत्यांच्या आयुष्यातला अत्यंत खास दिवस आहे. सिनेमाचे शहनशहा अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस या दिवशी असतो म्हणूनच हा दिवस सिनेरसिकांसाठी खास हे वेगळं सांगायला नकोच. यंदा बिग बी यांनी त्यांचा ८० वा वाढदिवस साजरा केला. अमिताभ यांना गेल्या ५० वर्षांपासून सिनेजगतावर राज्य करताना आपण पाहतोय. सत्तरच्या दशकात पडद्यावर आपल्या अभिनयाची कमाल दाखवत यशाची एकेक शिखरं पादाक्रांत करत पुढे निघालेले अमिताभ आजही सिनेसृष्टीत तितकेच सक्रिय आहेत. आजही त्यांच्याकडे बॅक टू बॅक सिनेमांच्या ऑफर्स आहेत.

वयाच्या ८० व्या वर्षी दिवसाचा सेकंद अन् सेकंद बिझी असणाऱ्या अमिताभचं जेवढं कौतूक करावं तेवढं कमीच. आजही कौन बनेगा करोडपती शो चा १४ वा सिझन तितक्याच दमदारपणे ते होस्ट करताना दिसतात. आणि मग अशा एनर्जेटिक अमिताभकडे पाहिल्यावर चाहत्यांना त्यांच्या फिटनेसविषयी प्रश्न पडला तर नवल नव्हे.

अमिताभ नेमकं असं काय करतात की एवढं वय असताना ते इतकं काम करतात. आपल्या फिटनेसची नेमकी काळजी कशी घेतात ते. असे नाना प्रश्न चाहते म्हणून आपल्या मनात असतीलच. मीडियासारख्या प्रभावी माध्यमात काम केल्यामुळं सेलिब्रिटींचे फिटनेस फंडा आम्हाला कळतात आणि मग ते तुमच्यापर्यंत आम्ही आणतो. आता अमिताभच्या खास डाएट विषयीही काही गोष्टी कळल्या आहेत. चला जाणून घेऊया त्याविषयी.(Amitabh Bachchan Diet secret)

Amitabh Bachchan Diet secret,
KBC14:स्पर्धकानं विचारलं,'तुमचे कपडे कोण धुतं, कपडे रिपीट करता का?; उत्तर देत अमिताभनी मारला सिक्सर

आपल्या आयुष्यात अमिताभ यांनी खूप मोठ्या आजारांचा सामना केला आहे. बोललं जातं की त्यांनी टी.बी आणि लिव्हर सिरोसिस सारख्या मोठ्या आजारांना आपल्या जिद्दीच्या बळावर परतवून लावलं आहे. एकदा अमिताभ यांनीच यासंदर्भात खुलासा केला होता की, त्यांच्या लिव्हरनं ७५ टक्के काम करणं बंद केलं होतं. त्याव्यतिरिक्त अमिताभनी दोनदा कोव्हिड-१९ वर मात केल्याचं देखील आपल्या सगळ्यांना माहीत आहे. रिपोर्ट्सनुसार कळत आहे की, बिग बी यांना मायस्थेनिया ग्रोविस ऑटो इम्यून डिसीज देखील झालं आहे. आणि त्यामुळे आपल्या या बिघडलेल्या शारिरीक प्रकृतीला नीट जपून ठेवण्यासाठी ते खूप काळजी घेतात. प्रत्येक गोष्टीत सतर्क असतात.

Amitabh Bachchan Diet secret,
KBC14: शहनशहाचा अश्रूचा बांध फुटला... जया बच्चन बोलून गेल्या अनेक वर्षांपूर्वीची मोठी गोष्ट

आपल्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी अमिताभ बच्चन सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीचं काटेकोरपणे पालन करतात ते म्हणजे,ते धुम्रपान किंवा मद्यपान करत नाहीत. तसंच,खूप वर्ष आधीच त्यांनी मांसाहार सोडला आहे. एकदम साधं जेवण ते जेवतात. आणि वर्कआऊट काही झालं तरी मिस करत नाहीत. अमिताभ योगा,प्राणायम नित्यनेमानं करतात. सकाळी उठल्यावर अमिताभ जीममध्ये देखील आवर्जुन जातात. आपल्या शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया व्यवस्थित राहावी यासाठी अमिताभ रोज २० मिनिटं चालतात. त्याव्यतिरिक्त ते कार्डिओवर देखील लक्ष देतात.

Amitabh Bachchan Diet secret,
Viral Video: आपल्या 80 व्या वाढदिवसानिमित्त अर्ध्या रात्री अमिताभचं चाहत्यांना सरप्राइज...

अमिताभ बच्चन आपल्या डाएटमध्ये सगळ्या देशी गोष्टींना प्राधान्य देतात. त्यांनी एकदा आपल्या ब्लॉगमध्ये आपल्या दिनक्रमाविषयी सविस्तर सांगितलं होतं. त्यांच्या दिवसाची सुरुवात ही वर्कआऊटनं होते. जिम केल्यानंतर ते खजूर, सफरचंद आणि इतर फळं खाणं पसंत करतात.

अमिताभना नाश्ता करताना दलिया किंवा कधी अंडा-बुर्जी(मांसाहार करत नसले तरी प्रोटीन म्हणून ते अंड आहारात घेतात) ,दूध, प्रोटीन ड्रिंक आणि बदाम खातात. त्यानंतर त्यांची रोजची औषधं घेतात, आवळ्याचं ज्यूस पितात,तुळशीची पानं आणि नाराळाचं पाणी देखील ते सेवन करतात आणि मग कामास सुरुवात करतात.

Amitabh Bachchan Diet secret,
Amitabh Bachchan: १९९२ ची गोष्ट, जेव्हा जया बच्चन यांच्यावर पत्रकारांसमोरच भडकले होते बिग बी

दुपारच्या जेवणात अमिताभ बच्चन साधं जेवण घेतात. यात डाळ,भाजी आणि चपातीचा समावेश असतो. रात्री खाण्यात अमिताभ फक्त सूप घेणं पसंत करतात. त्याव्यतिरिक्त पनीर बुर्जी ते डिनरमध्ये घेतात. मद्यप्राशन अमिताभ करतच नाहीत पण चहा,कॉफी,सॉफ्ट ड्रिंकपासूनही ते दूर राहतात. केबीसीच्या १२ सिझन दरम्यान अमिताभ बोलले होते की त्यांना चाटचे प्रकार आवडतात. त्यांना प्रत्येक प्रकारचं चाट आवडतं असं ते म्हणाले होते. याव्यतिरिक्त बंगाली मिठाई जीव की प्राण आहे त्यांच्यासाठी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.