Amitabh Bachchan And Covid : बाॅलीवूड महानायक अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे. घरीच त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बिग बी सोशल मीडियावर सक्रिय असून स्वतःविषयीचे अपडेट चाहत्यांना ते देत असतात. बच्चन यांनी आता एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी सांगितले, की त्यांना कोविडमध्ये कोण-कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachcha) यांनी नवीन ब्लाॅगमध्ये कोविडमध्ये (Covid) होणाऱ्या त्रासाचा उल्लेख केला आहे. ब्लाॅगनुसार नवीन स्टाफला गोष्टी समजायला अडचणी येत आहेत. यामुळेच अमिताभ बच्चन यांना स्वतःचे सर्व कामे स्वतःलाच करावी लागत आहेत. बच्चन लिहितात, कोविड झाल्यानंतर स्वतःची सर्व कामे स्वतःलाच करावी लागत आहेत. कपडे धुतोय. साफसफाई करत आहे.
तसेच टाॅयलेटही स्वतःच स्वच्छ करत आहे. वीजेचे बटण स्वतःच चालू-बंद करत आहे. चहा-काॅफीही बनवत आहे. या सर्व कामांमध्ये बिग बी सर्व लोकांशी फोनवरही बोलत आहेत. या व्यतिरिक्त ते स्वतःच पत्रही लिहित आहेत. सध्याच्या घडीला बिग बी जवळ नर्सही नाही. त्यामुळे त्यांना आपले औषधे स्वतःच घ्यावी लागत आहेत. (Bollywood News)
कोविड झाल्याने अमिताभ बच्चन यांना काही प्रमाणात त्रास अवश्य होत आहे. मात्र सर्व काम करताना त्यांना मजा येत आहे. बिग बी लिहितात, हे सर्व खूप मजेदार आणि स्वतःला समाधान देणारे अनुभव आहेत.
यामुळे ते स्वावलंबी होऊन सर्व कामे करत आहेत. आता ते कोणत्याही कामासाठी कर्मचाऱ्यांवर अवलंबून नाहीत. दिवसभर कर्मचाऱ्यांना कसे काम करावे लागत असेल याची अनुभूती त्यांना आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.