Amitabh Bachchan birthday : आपल्या अभिनयानं गेल्या पाच दशकांहून अधिक काळ ज्या अभिनेत्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य केले त्या बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं त्यांचे लाखो चाहते त्यांना सोशल मीडियावरुन शुभेच्छा देत आहे. बॉलीवूडमधील कित्येक सेलिब्रेटींनी देखील त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वयाच्या 80 व्या वर्षी देखील अमिताभ यांचा उत्साह हा नेहमीच नवअभिनेत्यांना प्रेरित करतो. त्यांच्या या अदम्य उत्साह आणि जिद्दीचे कायम कौतूक होत असते.
भलेही अमिताभ यांची छबी ही अँग्री यंग मॅन ही त्यांच्याच वेगवेगळ्या चित्रपटातून समोर आली असली तरी वैयक्तिक आयुष्यात मात्र ते नेहमीच शांत, संयमी स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध राहिले आहेत. कोट्यवधी भारतीय प्रेक्षकांचे आवडते अभिनेते म्हणून अमिताभ यांच्या नावाला नेहमीच पसंती मिळाली आहे. बॉलीवूडमधील आघाडीचे अभिनेते हे अमिताभ यांना आपला आदर्श मानत आले आहेत. अशा अमिताभ यांचा एकदा आपल्या वडिलांबरोबर बोलताना संयम सुटला होता. तो किस्सा यानिमित्तानं सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सात हिंदूस्थानी पासून सुरु झालेल्या महानायकाचा प्रवासा काही सोपा नव्हता. त्यांनी सुरुवातीची सात वर्षे प्रचंड संघर्ष केला. ज्यावेळी त्यांचा दीवार, जंजीर प्रदर्शित झाला तेव्हापासून बॉलीवूडमध्ये अमिताभ नावाचे वादळ पुढे अनेक दशकं चाहत्यांच्या मनात घोंघावत राहिले. या अभिनेत्याचा थाट, त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं कमालीचं प्रभावी आहे. अमिताभ यांच्या स्टारडमविषयी बोलताना त्यांचे चाहते थकत नाही. अमिताभ यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींमध्ये चाहत्यांना रस असल्याचे दिसून आले आहे.
अमिताभ जेव्हा त्यांच्या संघर्षमय काळात होते तेव्हा त्यांची आणि त्यांच्या वडीलांची बऱ्याचदा तू तू मैं मैं होत असे. त्याबद्दल एक किस्सा हा नेहमीच सांगितला जातो. नोकरीसाठी जिथे अर्ज करायचे तिथे त्यांना नकार मिळायचा अशावेळी ते प्रचंड निराश झाले होते. त्यामुळे त्यांना आपण आपल्या आयुष्यात आता काहीच करु शकणार नाही. असे वाटू लागले. आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म का दिला असा प्रश्न त्यांना पडला. याविषयी ते त्यांच्या मित्राशी चर्चाही करत असत.
एकेदिवशी अमिताभ यांना राग अनावर झाला. आणि त्यांनी थेट घरात भांडायला सुरुवात केली. त्यांनी रागाच्या भरात वडिलांना तुम्ही आम्हाला जन्मालाच का घातलं असा सवाल केला होता. मुलाचं हे उत्तर ऐकून हरिवंशराय बच्चन यांना मोठा धक्का बसला. ते काहीच बोलले नाही. अमिताभ बोलून निघून गेले. दुसऱ्या दिवशी अमिताभ जेव्हा परत वडिलांना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले तेव्हा त्यांनी अमिताभ यांच्यासाठी एक कविता लिहून ठेवली होती. ती कविता अमिताभ यांनी कायम आपल्या ह्रदयात जपून ठेवली आणि त्यानुसार वाटचाल करत उज्ज्वल यश संपादन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.