आर्थिक संकटात सापडलेल्या बिग बींना सुब्रत रॉय यांनी दिलेला सहारा, काय होता तो किस्सा?| Subrata Roy - Amitabh Bachchan

अमिताभ आणि सुब्रत रॉय यांच्या मैत्रीचे अनेक किस्से सांगितले जातात.
amitabh bachchan in financial crisis, was supported by Subrata Roy
amitabh bachchan in financial crisis, was supported by Subrata Roy SAKAL
Updated on

सहारा समुहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांचं मंगळवारी रात्री दुःखद निधन झालं. सुब्रत रॉय यांच्या निधनाने अनेक मान्यवर शोक व्यक्त करत आहेत. सुब्रत रॉय ७५ वर्षांचे होते.

खडतर परिस्थितीवर मात करत भारतातील एक प्रसिद्ध बिझनेस टायकून म्हणुन सुब्रत रॉय यांनी स्वतःची ओळख मिळवली. सुब्रत रॉय यांनी एकदा आर्थिक संकटात सापडलेल्या अमिताभ बच्चन यांना 'सहारा' दिला होता. काय होता तो किस्सा? जाणुन घ्या

(amitabh bachchan in financial crisis, was supported by Subrata Roy)

amitabh bachchan in financial crisis, was supported by Subrata Roy
Rahul Vaidya - Disha Parmar: दोन महिन्यानंतर राहुल - दिशाने केलं मुलीचं बारसं, ठेवलं हे खास नाव

दिवाळखोर अडकलेल्या अमिताभ बच्चन यांना सुब्रत रॉय यांनी दिला सहारा

१९९० ते २००० हा अमिताभ बच्चन यांच्या कारकीर्दीतला सगळ्यात अयशस्वी टप्पा होता. एकीकडे सिनेमे फ्लॉप होत होते तर दुसरीकडे बिग बी दिवाळखोरीत फसले होते.

यातुन बाहेर पडायला बिग बींनी अनेक बडे राजकीय नेते आणि उद्योगपतींचे दरवाजे ठोठावले. पण कोणाकडूनही मदत मिळाली नाही. त्यावेळी सहारा ग्रुपचे प्रमुख सुब्रत रॉय यांनी बिग बींना आर्थिक आधार दिल्याचं म्हटलं जातं.

अशी झाली अमिताभ - सुब्रत यांची मैत्री सुरु

मीडिया रिपोर्ट्सनुसार जेव्हा अमिताभ बच्चन दिवाळखोर झाले होते त्या काळात अमिताभ बच्चन यांचे मित्र अमर सिंह बिग बींसोबत सुब्रत रॉय यांना भेटायला गेले. त्या भल्यामोठ्या आर्थिक संकटातुन वाचण्यासाठी सुब्रत त्यांनी अमिताभ यांना मदत केली. आणि तिथूनच त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली. अमिताभ यांच्या प्रत्येक कौटुंबिक सोहळ्यात सुब्रत रॉय हजेरी लावायचे. शेवटपर्यंत ही मैत्री अबाधित राहिली.

सुब्रत रॉय यांच्या निधनाने हळहळ

देशभरात 'सहाराश्री' म्हणून प्रसिद्ध असलेले सुब्रत रॉय सहारा यांनी 1978 साली गोरखपूरमध्ये व्यवसाय सुरू करून सहारा इंडिया परिवाराची पायाभरणी केली. बुद्धीमत्ता आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी एवढे नाव कमावले होते की, २०१२ मध्ये इंडिया टुडे मासिकाने सुब्रत रॉय यांचा भारतातील १० सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश केला होता. सुब्रत रॉय यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()