Jaya Bachchan : 'मी हेमा इतकी सुंदर नाही, पण...' जयाजींचा स्वभावच तिखट!

बागबानमध्ये हेमा मालिनी आणि अमिताभ यांची केमिस्ट्री पाहून प्रेक्षक भारावून गेले होते. त्याची बराचकाळ चर्चाही झाली होती.
Jaya Bachchan
Jaya Bachchan esakal
Updated on

Jaya Bachchan Jealous of Hema Malini in Baghban : बागबान हा चित्रपट काही मुव्ही चॅनलला नेहमी दिसून येतो. या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन, हेमा मालिनी यांच्या भूमिकेनं बागबानची उंची वाढवली होती.

बागबानमध्ये हेमा मालिनी आणि अमिताभ यांची केमिस्ट्री पाहून प्रेक्षक भारावून गेले होते. त्याची बराचकाळ चर्चाही झाली होती. बागबान हा २००३ मधील एक सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यातील कथा प्रेक्षकांना भावली होती. आई, वडील आणि मुलं यांच्यातील वेगळं नातं या चित्रपटाच्या निमित्तानं समोर आलं होतं. त्यावेळी अमिताभ मुळे धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांचा तो चित्रपट पाहिला नसल्याची बातमी समोर आली होती.

Also Read - Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

Jaya Bachchan
Kajol Kiss: 29 वर्षांनंतर मोडला काजोलनं नो-किसिंग पॉलिसी रेकॉर्ड!

बागबान प्रदर्शित झाल्यानंतर अशी एक चर्चा होती की, हेमा मालिनी यांना ती भूमिका मिळाल्यानंतर जयाजी नाराज होत्या. त्यांना त्याविषयी विचारले होते. तुम्हाला हेमाजी यांची ती भूमिका मिळाली असती तर काय आनंद झाला असता का, यावर जयाजी यांचे मौन खूप काही सांगून जाणारे होते. पण जयाजी यांनी हेमाजी यांचे कौतूक केले होते. त्या एवढ्या सुंदर दिसत होत्या की, त्यांच्यापुढे मी काहीच नाही. असे म्हटले होते.

जया बच्चन यांनी म्हटले की, हेमाजी खूप सुंदर आहेत. पण त्या सुंदर आहेत तर त्यांना तसे का म्हणू नये. मला त्याचे काहीही वाटत नाही. मला त्यांच्याविषयी कोणत्याही प्रकारची असूयाही नाही. मी काही तुम्हाला अॅक्टिंगविषयी बोलली नाही. दिसण्यावरुन तुम्हाला दिलेली प्रतिक्रिया आहे. जया बच्चन यांची ती प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणारी आहे.

हेमा मालिनी यांनी सांगितले होते की, त्यांच्या पतीनं म्हणजे प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांनी त्यांचा बागबान नावाचा चित्रपट पाहिला नव्हता. याविषयी तेव्हा मोठ्या प्रमाणावर चर्चाही झाली होती. मात्र एका मुलाखतीमध्ये हेमा मालिनी याविषयी सत्य काय ते सांगितले होते. धर्मेंद्र यांनी तो चित्रपट पाहण्यास नकार दिला होता. हेमाजी यांनी पुन्हा एकदा ऑनस्क्रीन अमिताभ यांच्यासोबत काम केले होते. याचा राग धर्मेंद्र यांना असावा. मात्र त्यावर त्यांनी या प्रश्नावर हसून उत्तर देणे टाळले होते.

बागबान मध्ये काम करायचं नव्हतं....

त्या चित्रपटाशी संबंधित एक गोष्ट समोर आली होती. त्यामध्ये हेमा यांनी एका गोष्टीचा खुलासा केला होता. त्यांना काही झालं तरी बागबानमध्ये आपल्याला काम करायचे नव्हते. अशी भूमिका हेमाजींनी घेतली होती. त्यावरुन त्यावेळी मोठा वादही झाला होता. हेमाजींना चार मुलांच्या आईची भूमिका करायची नव्हती. त्यामुळे त्या व्यथीत होत्या. यापूर्वी त्यांनी अशी भूमिका साकारली नव्हती. अखेर ती भूमिका करण्यास त्या तयार झाल्या. आणि ती फिल्म सुपरहिट झाली होती.

Jaya Bachchan
Hollywood Strike RRR: हॉलीवुडच्या आंदोलनात RRR चं पोस्टर झळकलं, सिनेमाची अशीही हवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.