'रुके न तू, झुके न तू'; वडिलांची कविता म्हणत बिग बींनी दिली प्रेरणा

बिग बींनी सादर केली हरिवंशराय बच्चन यांची 'रूके न तू' ही कविता
Amitabh Bachchan
Amitabh Bachchan
Updated on

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या या संकटकाळात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. यात लोकांना धीर देण्याचं काम अनेकांकडून केलं जात आहे. बॉलिवूडसह इतर क्षेत्रातील दिग्गजांनी कोरोनाच्या या लढ्यात मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन Amitabh Bachchan यांनी कोविड सेंटरसाठी दोन कोटींची मदत तर दिलीच आहे. त्याशिवाय इतरत्रही त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत आलेल्यांना मदत पुरवली आहे. त्यानंतर आता अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावरून वडील हरिवंशराय बच्चन Harivansh rai bachchan यांच्या एका कवितेचं सादरीकरण करताना लोकांना हार मानू नका असं म्हटलं आहे. (Amitabh Bachchan posts motivational video reciting Harivansh Rai Bachchans poem)

हरिवंशराय बच्चन यांची 'रूके न तू' ही कविता बिग बींनी सादर केली आहे. 'सध्या भारत कोरोनाशी लढत आहे. आपण कोरोनाच्या या लढ्याविरुद्ध एकत्र यायलाच हवं. एकत्र लढायला हवं' असं बिग बी म्हणाले.

कोरोनाच्या काळात नागरिकांसमोर अनेक प्रश्न आहेत. त्यांना अनेक सेलिब्रिटींनी आतापर्यंत मदत केली. मात्र त्यावरून सेलिब्रिटींना ट्रोल करण्याचे प्रकारही घडले. यात बिग बींनाही ट्रोलर्सचा सामना करावा लागला. यानंतर एका पोस्टमधून बिग बींनी आपण किती चॅरीटी दिली याची माहितीही दिली.

हेही वाचा : 'येऊ कशी..'च्या सेटवर शुभांगी गोखलेंना अश्रू अनावर

रूके न तू

धनुष उठा, प्रहार कर

तू सबसे पहला वार कर

अग्नि सी धधक–धधक

हिरन सी सजग सजग

सिंह सी दहाड़ कर

शंख सी पुकार कर

रुके न तू, थके न तू

झुके न तू, थमे न तू

सदा चले, थके न तू

रुके न तू, झुके न तू

- हरिवंशराय बच्चन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.