बिग बी कोरोनाग्रस्तांच्या मदतीला, पोलंडवरुन मागवले 50 ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर्स

ते भारतात 15 मे पर्यत येणार असल्याची माहिती अमिताभ यांनी सोशल मीडियावरुन दिली आहे.
Amitabh Bachchan
Amitabh Bachchan Team esakal
Updated on

मुंबई - कोरोनाचा वाढणारा कहर लक्षात घेऊन बॉलीवूडमधील सेलिब्रेटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. यात वेगवेगळ्या कलाकारांनी आपलं योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. अभिनेता सोनु सुद (Sonu Sood), अक्षय कुमार (Akhsay Kumar) , अजय देवगण (Ajay Devgn) , अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukherji) , विद्या बालन (Vidya Balan), रविना टंडन, (Raveena Tondon) अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांचा समावेश आहे. बॉलीवूडच्या शहेनशहा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी कोरोनाग्रस्तांसाठी पुढाकार घेतला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर कुठल्याच प्रकारची मदत करत नसल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन आपण केलेल्या मदतीविषयी माहिती दिली होती. (amitabh bachchan procured 50 oxygen concentrators from poland donates 10 ventilators)

अमिताभ यांनी आता पोलंडवरुन 50 ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर्स मागवले आहेत. ते भारतात 15 मे पर्यत येणार असल्याची माहिती अमिताभ यांनी सोशल मीडियावरुन दिली आहे. अमिताभ यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर मदत केल्याबद्दल त्यांचे चाहत्यांनी आभार मानले आहेत. त्यांना धन्यवादही दिले आहेत. कोरोनाच्या काळातील या मदतीचे महत्व लक्षात घेऊन पोलीश सरकारनं ती उपकरणे पोहचविण्यासाठीचे भाडेही रद्द केले आहे.

अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, आता वेगवेगळ्या ठिकाणांहून भारताला मदत येते आहे. आपल्याला ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर्सची सर्वाधिक आवश्यकता आहे. ते मिळवण्यासाठी आपल्याला धडपडावे लागत आहे. मी तिकडील माझे काही मित्र भारतीय दुतावासाशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मी ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर्सच्या शोधात आहे असं त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी मला काही पर्याय सुचवले. प्रश्न होता की ते कॉन्सेट्रटर्स भारतात कसे आणायचे. सध्याच्या परिस्थितीत ते काम अवघड वाटत होते. मात्र तो प्रश्न त्या पोलीश सरकारनं सोड़वला.

Amitabh Bachchan
मैत्रीसाठी वाट्टेल ते! दानिशसाठी आशिष कुलकर्णीने केला रोजा
Amitabh Bachchan
"अन् दुसऱ्याच दिवशी मामा गेला"; पुष्कर जोगला अश्रू अनावर

अमिताभ यांनी पुढे सांगितले की, हे कॉन्सेट्रेटर्स 15 मे ला भारतात येणार आहेत. यावेळी अमिताभ यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. जे कॉन्सेट्रेटर्स भारतात येणार आहेत ते 5 लिटरचे आहेत. भारतात आल्यानंतर गरजुंना त्याचे वितरण केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.