Kaun Banega Crorepati 14: अमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोडपतीचा १४' वा सिझन होस्ट करत आहेत.काही दिवसांपूर्वीच हा शो सोनी टी.व्ही वर सुरु झाला आहे. प्रत्येक नवीन भागात शो मध्ये काही ना काही खुलासा होताना दिसत आहे. नुकताच अमिताभ बच्चन यांनी देखील UPSC परीक्षां संदर्भात मोठा खुलासा केला आहे. ११ ऑगस्ट रोजी टी.व्हीवर प्रसारित करण्यात आलेल्या केबीसीच्या भागात अमिताभ बच्चन यांनी सांगितले की कॉलेज संपल्यानंतर मी कितीतरी वेळा सरकारच्या स्पर्धा परिक्षांना बसलो आहे, पण कधीच पास झालो नाही,नेहमीच फेल झालो असा खुलासा केला आहे.(Amitabh bachchan revealed during the KBC Show about Civil Services exam)
११ ऑगस्टचा भाग गेल्या भागातील स्पर्धक श्रृती दुर्गापासूनच सुरू झाला. त्यांनी ५० लाख रुपये जिंकले होते. मात्र यानंतर त्या फार खेळू शकल्या नाहीत. त्यांनी हॉट सीट सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यानंतर भोपाळच्या संपदा सराफ गुर्जर यांनी खेळायला सुरुवात केली. संपदा डेप्युटी कलेक्टर आहेत आणि त्यांचे पती भोपाळच्या पोलिस खात्यात डीएसपी हुद्द्यावर कार्यरत आहेत. अमिताभ बच्चन यांनी संपदा हॉट सीटवर बसल्यावर एकदम आपल्या अनोख्या स्टाइलमध्ये म्हटलं, 'सरकार है आप तो.
यावर संपदा म्हणाल्या,'सरकार आप है'. संपदासोबतच्या संवादा दरम्यान अमिताभ बच्चन यांनी खुलासा करत म्हटलं,''मला खूप स्पर्धक भेटले ज्यांनी सांगितलं की त्यांनी स्पर्धा परिक्षा दिल्या आहेत. खूप कठीण असतात या परिक्षा. खूप प्रयत्न केल्यानंतरही यश मिळालं नाही की लोक या परिक्षांचा नाद सोडून देतात''.
अमिताभ पुढे म्हणाले की, ''मी देखील कॉलेज झाल्यानंतर स्पर्धा परिक्षांसाठी प्रयत्न केले,UPSC साठी. पण कधी पास नाही झालो आणि नापास होत गेलो. यावर संपदा त्यांना म्हणाल्या,माझ्या आईने देखील अनेकदा प्रयत्न केले आणि नंतर मला ही परिक्षा देण्यासाठी मार्गदर्शन केलं''.
याच भागात संपदा यांनी १.६ लाख रुपयांचा प्रश्न पार केल्यावर अमिताभ बच्चन यांनी सोनू सूदसोबत संपदा यांचे बोलणे करुन दिले. त्यांनी सोनू सूदला व्हिडीओ कॉल केला. सोनू सूद म्हणाला, ''कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेत संपदाने त्याला खूप सहकार्य केलं होतं. जेव्हा कोव्हिड दरम्यानं ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता पडत होती तेव्हा संपदानं केवळ आपल्याच जिल्ह्यात नाही तर इतरत्र देखील त्याचा पुरवठा व्हावा म्हणून आपल्या टीमला गाठीशी घेऊन प्रयत्न केल्याचं सोनू म्हणाला''. संपदानं देखील सोनू सूदनं कोव्हिड काळात खूप महान कार्य करत आपल्याला सहकार्य केल्याचं सांगितलं.
संपदा कौन बनेगा करोडपती शो दरम्यान खूप आत्मविश्वासानं उत्तरं देत होत्या. २५ लाखाच्या प्रश्नावर मात्र त्यांना थांबावं लागलं. कारण कोणतीही लाईफ लाइन शिल्लक नव्हती. पण तरीदेखील शो न सोडता त्यांनी खेळायचं ठरवलं आणि उत्तर दिलं. पण ते उत्तर चुकीच निघालं आणि संपदा केवळ ३ लाख,२० हजार रुपये सोबत नेऊ शकल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.