Kaun Banega Crorepati 14: बॉलीवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन नेहमीच सोशल मीडियावर तसंच आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या आयुष्याशी जोडले गेलेले अनेक अनुभव शेअर करताना दिसतात. आता पुन्हा एकदा बिग बी यांनी आपल्या ब्लॉग मध्ये एक सुंदर गोष्ट सांगितली आहे, पण पहिल्यांदाच त्यांनी स्वतःचा एक सुन्न करणारा अनुभव देखील शेअर केला आहे. अमिताभनी लिहिलेला सुंदर किस्सा 'कौन बनेगा करोडपती' शो संबंधित आहे. आपल्या शो च्या सेटवर एका खास व्यक्तीला अमिताभ बच्चन भेटले अन् त्यानंतर त्यांच्याकडून हा सुंदर किस्सा लिहिला गेला.(Amitabh Bachchan says he lost use of his limbs during medical torments)
ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की, 'कौन बनेगा करोडपती १४' च्या सेटवर त्यांची भेट अवनी नावाच्या मुलीसोबत झाली. अवनी ही अंध मुलगी आहे. बिग बी म्हणाले की तिचं सहज वावरणं खूपच आश्चर्यकारक होतं. तिला पाहून अमिताभ यांना आठवला आपल्या आयुष्यात घडून गेलेला तो काळ जेव्हा ते आपल्या हाता-पायांना हलवू शकत नव्हते. पण योग्य उपचारांमुळे पुढे सगळं अशक्य ते शक्य झालं. आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.
काही दिवसांपूर्वीच अमिताभ यांना दुसऱ्यांना कोरोनानं गाठलं होतं. आपल्या प्रकृतीविषयी त्यांनी स्वतः सोशल मीडियावरुन माहिती दिली होती. पण आता कोरोनानंतर बिग बी यांना डॉक्टरांनी लोकांमध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे. केबीसीच्या मंचावर देखील ते प्रेक्षकांच्या जवळ जाताना दिसत नाहीत. स्वतःला गर्दीपासून अलिप्त ठेवत आहेत. पण अवनीपासून मात्र ते स्वतःला दूर ठेवू शकले नाहीत. तिच्यासाठी त्यांनी नेहमीचा नियम तोडल्याचं समोर आलं आहे. ते म्हणाले की,''ही एक अशी भावना होती जी फक्त अनुभवली जाऊ शकत होती''.
बिग बी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की,''मी तिचे हात माझ्या हातात घेतले,तिला स्पर्श केला, म्हणजे तिला कळावं की मी तिच्या जवळ उभा आहे''. तेव्हा अमिताभनी अवनीनं ज्या पद्धतीनं त्यांच्याकडे पाहिलं याविषयी देखील सविस्तर सांगितलं आहे. ते म्हणाले की,''तिला माझ्याविषयी,माझ्या सिनेमांविषयी सगळं माहित होतं. २०१९ ला माझ्या वाढदिवशी अवनीने मला पत्र लिहिलं होतं. तिनं केबीसी मध्ये आल्यावर मला विचारलं की मला तिचं पत्र मिळालं होतं का? ती मला म्हणाली की, ती मला सोशल मीडियावर फॉलो करते,मग मी पण तिला वचन दिलं की,मी देखील तिला फॉलो करेन. आणि आज सकाळीच मी तिला फॉलो करायला सुरुवात केली. इन्स्टा आणि फेसबूक दोन्ही ठिकाणी, आणि ट्वीटरवर देखील''.
यापुढे अमिताभ यांनी आपल्या आयु्ष्याविषयी देखील काही गोष्टी ब्लॉगमध्ये शेअर केल्यात. ते म्हणाले की,''मला काही शारिरीक व्याधींशी खूप मोठी झुंज द्यावी लागली होती. असं अनेकदा माझ्यासोबत झालंय जेव्हा-जेव्हा आजारामुळे माझे अवयव निकामी झालेयत. त्यांनी काम करणं बंद केलं होतं. याविषयी मी फार काही उगाचच सांगत बसणार नाही तुम्हाला. पण एवढंच सांगेन की त्या प्रत्येक कठीण प्रसंगात देवाच्या कृपेने, कुटुंबाच्या मदतीनं,मोठ्यांच्या आशीर्वादाने,डॉक्टरांच्या प्रयत्नांनी मी ठणठणीत बरा झालो. खुप अडचणीतून प्रवास केल्यावर सगळं पहिल्यासारखं म्हणता येणार नाही पण व्यवस्थित झालं आहे एवढं मात्र नक्की''.
लहान मुलांच्या आयुष्यावर बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले की,''खूप लोकांच्या बाबतीत असं झालंय ज्यांनी आपलं शरीरानं सक्षम होणं गमावलं आहे,आणि पुन्हा ते त्यांना कधीच मिळालं नाही. त्यांच्याविषयी विचार केला की खरंच मन सुन्न होतं. खासकरुन अवनी आणि तिच्यासारख्याच दोन छोट्या मुलांना पाहिल्यावर आणखी मन दुःखावतं. मी माझ्या आयुष्यात गमावलं होतं जे पुन्हा मला मिळालं . पण या मुलांच्या बाबतीत तसं नाही झालं. हा पक्षपातीपणा म्हणावा का निसर्गाचा?''
अमिताभ आता कोरोनामुक्त झाले असून पुन्हा शूटिंगवर परलेयत. सध्या ते 'केबीसी १४' चं सूत्रसंचालन करत आहेत. लवकरच त्यांचा रश्मिका मंदानासोबतचा 'गूडबाय' भेटीस येतोय. सिनेमाचं नवीन पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.