'जेव्हा पहिल्यांदा माझ्या वडिलांना मी रडताना पाहिलेलं', अमिताभ यांची भावूक पोस्ट

amitabh
amitabh
Updated on

मुंबई- बॉलीवू़ड महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आयुष्यात कित्येकदा त्यांच्या मृत्युला चकमा दिला आहे. आजपासून ३८ वर्ष पहिले अमिताभ बच्चन यांच्यासोबत सगळ्यात मोठा हादसा झाला होता. बिग बी त्यांच्या 'कुली' सिनेमाच्या शूटींग दरम्यान अत्यंत घायाळ झाले होते. त्यांनी बराच काळ हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले आणि मृत्युच्या दारातून बाहेर आले. त्या घटनेची आठवण काढत अमिताभ बच्चन यांनी सोशल मिडियावर भावूक पोस्ट केली आहे. 

अमिताभ बच्चन यांचे ट्विटरवर ४५ मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहोत. यावेळी बिग बी यांच्या एका चाहत्याने सोशल मिडियावर थ्रॉबॅक फोटो शेअर केला ज्यामध्ये अमिताभ बच्चन त्यांच्या वडिलांसोबत आणि अभिषेक बच्चनसोबत दिसून येत आहेत. त्या चाहत्याने केवळ अमिताभ बच्चन यांना शुभेच्छा दिल्या होत्या मात्र अमिताभ यांना ती जुनी आठवण पुन्हा आठवली.

तो फोटो शेअर करत अमिताभ बच्चनने त्यामागची कहाणी सांगितली आहे. ते सांगतात,  'एक चाहता सांगत आहे माझे ४५ मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. मात्र हा फोटो काही वेगळंच सांगत आहे. ही ती वेळ होती जेव्हा 'कुली' अपघात झाल्यानंतर ठीक होऊन घरी आला होता. हे पहिल्यांदा होतं जेव्हा मी माझ्या वडिलांना रडताना पाहिलं होतं. अभिषेक देखील मला खूप काळजीत दिसत होता.' सोशल मिडियावर बिग बींची ही भावूक पोस्ट व्हायरल होत आहे.

कित्येक चाहत्यांना देखील ती आठवण आठवली जेव्हा ते सतत अमिताभ यांच्यासाठी प्रार्थना करत होते. या व्हायरल फोटोवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडत आहे. तसं म्हणायला गेलं तर ही पोस्ट ४५ मिलियन फॉलोअर्ससाठी होती मात्र इथे सगळ्यांच लक्ष पुन्हा एकदा ३८ वर्षापूर्वी घडलेल्या घटनेवर गेलं. अमिताभ यांच्या त्या घटनेनंतर त्याच्या आयुष्यात खूप मोठा बदल दिसून आला. ७८ वर्षीय बिग बींकडे आजही कामाची काही कमी नाहीये. या वयातही ते त्यांच्या कामाप्रती खूप प्रेम करतात आणि तेवढीच मेहनत घेतात.     

amitabh bachchan shares emotional post remember coolie accident  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()