Amitabh Bachchan: चाहत्यांना इतका मान फक्त अमिताभच देऊ शकतात; म्हणाले,''मी कधीच...''

अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांना पाहिल्यावर पायातील चप्पल काढून ठेवण्याचं कारण स्पष्ट केलं आहे.
Amitabh Bachchan takes off his shoes before meeting his fans
Amitabh Bachchan takes off his shoes before meeting his fans Google
Updated on

Amitabh Bachchan: शाहरुख खान आणि सलमान खान ईदच्या सणाला आणि त्यांच्या वाढदिवशी घराच्या बाहेर त्यांची वाट पाहत ताटकळत उभ्या असलेल्या हजारो चाहत्यांना मोठ्या प्रेमाने भेटतात,अगदी तसंच बॉलीवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन दर रविवारी आपल्या चाहत्यांना वेळ काढून भेटतात. अमिताभ बच्चनच्या 'जलसा' बंगल्या बाहेर दर रविवारी मोठ्या संख्येनं चाहत्यांची गर्दी जमा होते. (Amitabh Bachchan takes off his shoes before meeting his fans )

Amitabh Bachchan takes off his shoes before meeting his fans
Big Boss Marathi 4: फक्त मारामारीच व्हायची राहिली बाकी...प्रसाद-समृद्धीत जुंपली

अमिताभ देखील चाहत्यांना निराश करत नाही. पण आता जलसा बंगल्याबाहेर पहिल्यासारखी चाहत्यांची गर्दी पहायला मिळत नाही असं दस्तुरखुद्द अमिताभ बच्चननी त्यांच्या ब्लॉगमधनं म्हटलं आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये आपण चाहत्यांना पाहिल्यावर पायातील चप्पल का काढून ठेवतो याविषयी देखील स्पष्ट केलं आहे.

Amitabh Bachchan takes off his shoes before meeting his fans
Riteish Deshmukh आणि जेनेलियाचा 'मिस्टर मम्मी' अडचणीत, स्क्रिप्ट चोरल्याचा होतोय आरोप

गेल्या रविवारी ३० ऑक्टोबरला जेव्हा चाहत्यांची गर्दी अमिताभ बच्चनच्या बंगल्याबाहेर जमा झाली होती,तेव्हा बिग बी यांनी देखील त्यांची मोठ्या प्रेमानं भेट घेतली. चाहत्यांना अभिवादन करण्याआधी अमिताभ यांनी सर्वप्रथम आपली चप्पल पायातून काढून बाजूला ठेवली आणि त्यांनतर सर्वांना हाथ उंचावून अभिवादन केलं.

Amitabh Bachchan takes off his shoes before meeting his fans
Big Boss Marathi 4: 'कानामागून आली अन् तिखट झाली...', स्नेहलतावर भडकली अमृता धोंगडे

आपण चाहत्यांना अभिवादन करण्यापूर्वी पायातील चप्पल बाजूला काढून ठेवतो यामागे आपल्या मनात निव्वळ त्यांच्याप्रती भक्ती आहे हे त्यांनी सांगितले. अमिताभ पुढे म्हणाले,मी कधीच पायात चप्पल घालून चाहत्यांना अभिवादन करत नाही. आपल्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी होते ही गोष्ट आपल्यासाठी खूप मोठी आहे आणि आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे असं देखील अमिताभ म्हणाले.

अमिताभ यांनी ३० ऑक्टोबरला लिहिलेल्या आपल्या ब्लॉगमध्ये यासंदर्भात नुसतं लिहिलंच नाही तर काही फोटो देखील शेअर केले आहेत. अमिताभ यांनी कोरोनाच्या प्रादुर्भवा दरम्यान आपल्या चाहत्यांना भेटणं बंद केलं होतं. पण जसा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तसं अमिताभनी एप्रिल २०२२ पासून पुन्हा चाहत्यांना भेटणं सुरू केलं.

Amitabh Bachchan takes off his shoes before meeting his fans
Amitabh Bachchan: अमिताभला 'नॉटी' म्हणू लागलेयत लोक, एका फोटोनं उडवली खळबळ

आता आपल्या घराबाहेर पहिल्यासारखी चाहत्यांची गर्दी नसते असं देखील अमिताभ यांनी त्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, ''मी पाहतोय आाता हळूहळू चाहत्यांची गर्दी कमी झालीय,मला भेटण्याचा चाहत्यांचा उत्साहही आता पहिल्यासारखा राहिला नाही. मला पाहताच लोक ज्या आवेगानं ओरडायचे तो आवाज आता बंद झाला आहे,त्याची जागा आता मोबाईल कॅमेऱ्यानं घेतली आहे. यावरनं हे सिद्ध होतं की आता वेळ बदललीय आणि कुठलीच गोष्ट कायम राहत नाही''.

Amitabh Bachchan takes off his shoes before meeting his fans
Kantara: पाण्याच्या बॉट्ल्स विकल्या, हॉटेलमध्ये राबला... 'कांतारा'चा हिरो कसा बनला सुपरस्टार?

अमिताभ यांच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर वयाच्या ८० व्या वर्षीही ते शूटिंगमध्ये सुपरबिझी आहेत. यावर्षात त्यांचे 'ब्रह्मास्त्र','चुप-रिवेंज ऑफ द आर्टिस्ट','रनवे-३४','झुंड','राधे श्याम' आणि 'गूडबाय' सिनेमे आपल्या भेटीस आले होते. आणि आता लवकरच 'उंचाई','गणपत','द उमेश क्रॉनिकल्स','बटरफ्लाय','प्रोजेक्ट के' हे सिनेमे आपल्या भेटीस येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.