India Vs Bharat : 'तुम्ही आता बीजेपीमध्ये जा!' 'भारत माता की जय' बोलणं अमिताभ यांना पडलं महागात

तुम्ही कुणाच्या बाजूनं आहात इंडिया की भारत असा प्रश्न तुमच्यासमोर वेगवेगळ्या प्रकारे समोर येताना दिसत आहे.
Amitabh Bachchan trolled India Vs Bharat battle PM Narendra Modi
Amitabh Bachchan trolled India Vs Bharat battle PM Narendra Modi esakal
Updated on

Amitabh Bachchan trolled India Vs Bharat battle PM Narendra Modi : तुम्ही कुणाच्या बाजूनं आहात इंडिया की भारत असा प्रश्न तुमच्यासमोर वेगवेगळ्या प्रकारे समोर येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून इंडिया विरुद्ध भारत असा वाद होत आहे. त्यात अनेकांनी आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बॉलीवूडचे शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन यांच्या ट्विटकडे लक्ष वेधून घेतले आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आगामी निवडणूकीमध्ये जशास तसे उत्तर देण्यासाठी विरोधी पक्षांनी इंडिया नावाची आघाडी उभारली आहे. त्यातून त्यांनी येणाऱ्या निवडणूकांमधून मोदींचा पराभव करणार असल्याचे संकेत दिले आहे. अशातच सोशल मीडियावर इंडिया विरुद्ध भारत वादात बॉलीवूड सेलिब्रेटींनी दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेचा विषय आहे.

Also Read - हॅप्पी हार्मोन...

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या ट्विटनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी भारत माता की जय म्हणत वेगळाच संदेश दिला आहे. अशातच त्यांच्यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तुम्ही आता भाजपमध्ये जाण्याची वेळ आली आहे. अशा शब्दांत नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे.

Amitabh Bachchan trolled India Vs Bharat battle PM Narendra Modi
Jawan Fever: महाराष्ट्रात या ठिकाणी मध्यरात्री २ वाजता प्रेक्षकांची रांग, जवान पाहण्यासाठी शाहरुखच्या फॅन्सची गर्दी

काय होतं त्या ट्विटमध्ये?

८० वर्षांच्या बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या त्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, "T 4759 - भारत माता की जय।" यासोबत त्यांनी तिरंग्याचा आणि लाल ध्वजाचा एक इमोजी देखील शेयर केला आहे. अमितजी यांच्या त्या ट्विटवरुन त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून इंडिया विरुद्ध भारत असा संघर्ष सुरु झाला आहे. त्यात पंतप्रधान कार्यालयाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या मोहीम राबवण्यास सुरुवात झाली आहे.

Amitabh Bachchan trolled India Vs Bharat battle PM Narendra Modi
Dharmendra On Jawan: "शाहरुख माझ्या बाळा..." जवान रिलीजपुर्वीच धर्मेंद्रची किंग खानसाठी खास पोस्ट चर्चेत

एका इव्हेंटच्या दरम्यान कॉग्रेस पर्यवेक्षक अनुराधा मिश्रा यांचा जयपूर मध्ये घडलेल्या त्या प्रकारानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मिश्रा यांनी तर आपल्या कार्यकर्त्यानं भारत माता की जयच्या घोषणा द्यायच्या नाहीत असे सांगून वेगळ्याच चर्चेला सुरुवात करुन दिली आहे. त्यामुळे दुसरीकडे कॉग्रेसदेखील वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अमिताभ बच्चन यांनी जे ट्विट केले आहे कॉग्रेसला परखड उत्तर आहे. असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.