Amitabh Bachchan : अमिताभ साकारणार 'पी.व्ही. नरसिंह राव' यांची भूमिका, प्रकाश झा करणार दिग्दर्शन?

प्रकाश झा यांच्या नव्या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan New Movie) हे एका वेगळ्या भूमिकेतून समोर येणार असल्याची चर्चा आहे.
amitabh bachchan viral news
amitabh bachchan viral newsesakal
Updated on

Amitabh Bachchan will play Role Narsimha Rao Biopic : राजनीती, आरक्षण, गंगाजल सारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांचं निर्मिती करुन आपली ओळख भारतीय चित्रपट विश्वात तयार करणाऱ्या प्रकाश झा यांचा (Prakash Jha Movie Latest news) चाहतावर्ग मोठा आहे. गेल्या काही वर्षात ते त्यांच्या आश्रम नावाच्या मालिकेमुळे चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये बॉबी देओलनं महत्वाची भूमिका साकारली आहे.

प्रकाश झा यांच्या आश्रम या मालिकेचे आतापर्यत तीन सीझन प्रदर्शित झाले असून त्याच्या चौथ्या सीझनची प्रेक्षक आतूरतेनं वाट पाहत आहेत. (asharam web serise) त्या मालिकेवरून प्रकाश झा यांच्यावर हल्लाही झाल्याचे दिसून आले आहे. आश्रम ही मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडली असे म्हटले जात असले तरी त्या मालिकेला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद प्रचंड असल्याचे नाकारता येणार नाही.

अशातच बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांच्याविषयीची एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे बिग बी अमिताभ (Amitabh Bachchan Latest news) बच्चन हे भारताचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांची भूमिका करणार आहे. त्या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश झा हे करणार आहेत. या बातमीमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. अर्थात बिग बी यांच्याकडून किंवा त्या वेबसीरिजच्या मेकर्सकडून अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सध्या सोशल मीडियावर बिग बी अमिताभ बच्चन यांच्याविषयी जी बातमी व्हायरल होत आहे त्यात असे म्हटले आहे की ते येत्या काळात देशाचे माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांच्या बायोपिक सीरिजमध्ये लिड रोलमध्ये दिसणार आहे. समीर नायर आणि अपलॉझ इंटरटेनमेंट कॉलोबरेशन अहा स्टुडिओच्या वतीनं नरसिंह राव यांच्या प्रोजेक्टवर काम सुरु केलं जाणार असल्याची चर्चा आहे.

amitabh bachchan viral news
Laapataa Ladies Review : चक्क करण जोहरनं किरण रावच्या 'लापता लेडिज'चा केला रिव्ह्यू! 'हा चित्रपट म्हणजे...'

या सगळ्यात जेव्हा नरसिंह राव यांची भूमिका कोण साकारणार याविषयी चर्चा झाली तेव्हा त्यात अमिताभ बच्चन यांचे नाव पुढे आल्याची चर्चा आहे. टाईम्स नाऊनं या संदर्भात बातमी दिली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश झा या बायोपिकचे दिग्दर्शन करणार आहेत. यापूर्वी झा आणि बिग बी यांनी दोन प्रोजेक्टमध्ये काम केले आहे. त्यात आरक्षण आणि सत्याग्रह चे नाव सांगता येईल. त्या भूमिका वास्तव घटनेवर आधारित होत्या.

पी व्ही नरसिंह राव यांना भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्ननं गौरविण्यात आले होते. भारताच्या आर्थिक जडघडणीमध्ये त्यांनी राबवलेल्या धोरणांचा मोठा वाटा होता. असे म्हटले जाते. १९९१ ते १९९६ दरम्यान त्यांची कारकीर्द भारतीय राजकीय विश्वात महत्वाची मानली जाते.

अद्याप या सीरिजच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली नसली तरी येत्या काळात हिंदी, तेलुगू, मल्याळम, तमिळ भाषेत प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.