PM Narendra Modi Biopic: अमिताभ बच्चन बनणार PM नरेंद्र मोदी? बायोपिकची तयारी सुरु...

PM Narendra Modi Biopic
PM Narendra Modi BiopicEsakal
Updated on

PM Narendra Modi Biopic बॉलिवूड मेगा स्टार अमिताभ बच्चन हे मनोरंजन विश्वातलं खुप मोठ नावं आहे. गेल्या अनेक दशकांपासून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. त्यांची नेहमीच चर्चा होत असते. त्याच्या चित्रपटांमुळे असो किंवा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे त्यांची चर्चा असतेच.

बॉलीवूडचे शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन वयाची 80 वर्षे पूर्ण केल्यानंतरही चित्रपट विश्वात सक्रिय आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक भुमिका साकरल्या आहेत.

PM Narendra Modi Biopic
Prajakta Mali: प्राजक्ता माळीचा फोन बंद ! मौनव्रत धारण करत सोशल मिडियावर दिले मोठे संकेत..

हिरो, खलनायक, वडिल, इतकच नाही तर आपल्या मुलगा अभिषेकच्या मुलाच्या भुमिकेतही ते दिसले. लवकरच बिग बी प्रभास आणि दीपिकाच्या मल्टीस्टारर प्रोजेक्ट के मध्ये दिसणार आहे. यात चित्रपटाचा टिझरही आज रिलिज करण्यात आला आहेत.

दरम्यान आता अमिताभ बच्चन यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये अमिताभ बच्चन दिसणार असल्याच्या चर्चा आहेत.

टॉयलेट एक प्रेम कथा आणि परी सारख्या सुपरहिट चित्रपटांसाठी ओळखल्या जाणार्‍या निर्मात्या प्रेरणा अरोरा या आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बायोपिक बनवण्याच्या तयारीत आहेत. या बायोपिकसाठी त्यांनी मुख्य भुमिकेसाठी अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आल्याच्या समोर आल्या आहेत.

PM Narendra Modi Biopic
Gurugram Bhojpuri Actress: गुरुग्राममध्ये काम देण्याचा बहाणा करुन २४ वर्षीय भोजपुरी अभिनेत्रीवर बलात्कार

झूमनं दिलेल्या वृत्तानुसार, प्रेरणाला जेव्हा नरेंद्र मोदींवर चित्रपट का बनवायचा आहे असं विचारलं गेलं तेव्हा ती म्हणाली की ती नरेंद्र मोदींना भारतातील सर्वात 'शक्तिशाली, सुंदर आणि सक्षम' व्यक्ती मानते. नायक म्हणून पंतप्रधानांचे व्यक्तिमत्त्व त्यांना प्रभावित करते. त्यामुळेच तिनं त्यांच्यावर चित्रपट बनवण्याचा ठरवलं आता तिला पंतप्रधानांचं आयुष्य पडद्यावर प्रेक्षकांना दाखवायचं आहे.

PM Narendra Modi Biopic
Priyanka Chopra On Manipur Violence: मणिपूरच्या घटनेनं देश हादरला! प्रियंकाची 'तळपायाची आग मस्तकात'

या बायोपिकमध्ये ती पीएम मोदींबद्दल कोणत्या गोष्टी मोठ्या पडद्यावर दाखवेल हे देखील तिनं सांगतिलं आहे. याबाबत तिने सांगतिलं की, ती या बायोपिकमध्ये पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या जीवनातील अनेक पैलूंचा समावेश करेल.

परराष्ट्र धोरण स्वीकारण्यापासून ते आर्थिक विकासापर्यंत, त्यांनी कोविड-19 काळातील त्यांच्या भुमिका आणि यासोबतच पीएम मोदींचे बालपण, राजकीय कारकीर्द ते निवडणूक जिंकण्यापर्यंतचा काळ सगळंच या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

या चित्रपटासाठी नायक म्हणून तिला अमिताभ बच्चन यांना कास्ट करायचे आहे. ती म्हणते की, अमिताभ बच्चन पडद्यावर पंतप्रधान मोदींची भूमिका उत्तमरीत्या साकारू शकतील असा तिला विश्वास आहे. आता प्रेरणाच्या या ऑफरवर अमिताभ बच्चन यांची काय प्रतिक्रिया असेल आणि ते हा सिनेमा साईन करतील का हे तर बिग बी सांगू शकतात.

PM Narendra Modi Biopic
Bawaal Movie Review: दंगलच्या दिग्दर्शकाने पुन्हा मैदान मारलं, वरुण - जान्हवीचा बवाल तुम्हाला नक्कीच आवडेल

त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, आता 'प्रोजेक्ट के' या चित्रपटात अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहेत. त्याच्याकडे 'घूमर', 'गणपत', 'द उमेश क्रॉनिकल्स', 'बटरफ्लाय' या चित्रपटात दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.