Amitabh Bachchan: लेकीला बंगला दिल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी केली मोठी गुंतवणूक ! दरवर्षी करणार करोडोंची कमाई!

अभिताभ बच्चन यांची 3000 करोडची संपत्ती आहे. आता पुन्हा बिग बींच्या वार्षिक उत्पन्नात एक नवीन स्रोत जोडला गेला आहे.
Kaun Banega Crorepati Amitabh Bachchan
Kaun Banega Crorepati Amitabh Bachchan esakal
Updated on

Amitabh Bachchan Property On Rent: बॉलिवूड शहनशाह अमिताभ बच्चन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेते आहे. इतकंच नाही तर बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणारे अभिनेते अमिताभ आहे. त्यांची संपत्ती करोडोंमध्ये आहे.

ते केवळ चित्रपटांतूनच नाही तर त्यांच्या टीव्ही शो आणि जाहिरातींमधूनही भरपूर पैसे कमावतात. मिडिया रिपोर्टनुसार अभिताभ बच्चन यांची 3000 करोडची संपत्ती आहे. आता पुन्हा बिग बींच्या वार्षिक उत्पन्नात एक नवीन स्रोत जोडला गेला आहे.

Kaun Banega Crorepati Amitabh Bachchan
Prathamesh - Mugdha Wedding: असं झालं मुग्धाचं लघाटेंच्या घरी स्वागत, प्रथमेश उखाणा घेत म्हणाला, "मारक्या म्हशी..."

मिळालेला माहितीनुसार, अमिताभ यांनी 4 बिझनेस ऑफिसेस भाड्याने दिली आहेत. अमिताभ यांनी याच वर्षी हे ऑफिस विकत घेतले होते. तर आता अमिताभ यांच्या या ऑफिसची भाड्याची किंमत किती हा चर्चेचा मुद्दा आहे. वॉर्नर म्युझिक कंपनीने अमिताभ यांचे हे ऑफिस भाड्याने घेतले आहे.

Kaun Banega Crorepati Amitabh Bachchan
Rajkumar Hirani : 'रणबीर'ला घेऊन पुन्हा चित्रपट करणार? काय म्हणाले 'डंकी'चे दिग्दर्शक

ई टाईम्सच्या बातमीनुसार, अमिताभ यांनी मुंबईत त्यांची 4 नवीन ऑफिसेस वॉर्नर म्युझिक कंपनीला भाड्याने दिली आहेत. या आलिशान ऑफिस स्पेससाठी म्युझिक कंपनी त्यांना वर्षाला 2 कोटी रुपये देणार आहेत.

या आलिशान ऑफिस बद्दल बोलायचं झालं तर हे ऑफिस लोटस सिग्नेचरच्या 21 व्या मजल्यावर आहे. तर अनेक सेलिब्रिटींची ऑफिसेस या इमारतीत आहेत.

वॉर्नर म्युझिक कंपनीने घेतलेल्या ऑफिस शेजारी निर्माता साजिद नाडियादवाला यांचे ऑफिस आहे. या इमारतीत मनोज बाजपेयी, कार्तिक आर्यन, सारा अली खान आणि काजोल यांचे देखील ऑफिसेस आहेत.

तर वॉर्नर म्युझिक कंपनीने हे ऑफिस 5 वर्षांसाठी लीजवर घेतले आहे. अमिताभ यांनी ऑगस्ट 2023 मध्ये 10,000 चौरस फुटांची 4 ऑफिसेस खरेदी केली होती. तर एका कार्यालयाची किंमत 7.18 कोटी रुपये होती.

Kaun Banega Crorepati Amitabh Bachchan
Kareena Kapoor : 'आमच्या पिढीतले कलाकार जास्त मेहनती, आताचे फक्त....!' करिना कपूरनं नव्या सेलिब्रेटींचे टोचले कान

गेल्या महिन्यात अमिताभ हे त्यांच्या प्रतिक्षा या बंगल्यामुळे चर्चेत होते. त्यांनी हा बंगला त्यांची मुलगी श्वेता बच्चनच्या नावावर केला आहे. अमिताभ आणि जया बच्चन यांनी दिवाळीपूर्वी श्वेताला हा आलिशान बंगला गिफ्ट केल्याची चर्चा होती.

या बंगल्यात अमिताभ त्याचे वडील हरिवंशराय बच्चन आणि आई तेजी बच्चन यांच्यासोबत राहत होते. 50. 63 कोटींच्या या बंगल्यात अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे लग्न झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.