शिवसेनेत पुन्हा फूट, आदेश बांदेकरांवर गंभीर आरोप.. अमोल परब यांचा राजीनामा

शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्यावर सरचिटणीस अमोल परब यांनी गंभीर आरोप केले आहे.
Amol Parab has  serious allegations against Shiv Sena Chitrapat Sena president Adesh Bandekar.
Amol Parab has serious allegations against Shiv Sena Chitrapat Sena president Adesh Bandekar.sakal
Updated on

adesh bandekar : गेली काही दिवस शिवसेना पक्षाला लागलेला सुरुंग आता वाढतोच आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत मोठी फुट पडली. एकनाथ शिंदे भाजप च्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले खरे पण शिवसेनेने मात्रा त्यांच्यासाठी दार बंद केले आहे. सध्या शिवसेनेत बरेच कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातही बंडखोर आमदारांनी थेट संजय राऊत शिवसेना संपवण्यास कारणीभूत असल्याचा आरोप केला. हे प्रकरण ताजे असतानाच आता शिवसेनेत नवी फूट पडली आहे. शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे सरचिटणीस यांनी आदेश बांदेकर यांच्यावर गंभीर आरोप करणारे पत्र लिहिले आहे. (Amol Parab has serious allegations against Shiv Sena Chitrapat Sena president Adesh Bandekar.)

अभिनेते आदेश बांदेकर हे उभ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. ते शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्षही आहेत. पण चित्रपट सेनेतील पदाधिकारी मात्र त्यांच्यावर नाराज आहेत. चित्रपट सेनेचे चिटणीस अमोल परब यांनी थेट माध्यमांकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेत कार्यकर्त्यांचा अपमान होतो असे त्यांचे म्हणणे आहे. याच जाचाला कंटाळून त्यांनी आपल्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. (adesh bandekar latest news)

'मी वरळीत एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेतचं समर्थन केलं होतं आणि पोस्टर लावले होते त्यामुळे मला आपल्याच पक्षाचे लोक गद्दार बोलले. मी आज माझ्या सदस्य आणि माझ्या पदाचा राजीनामा देतो आहे. मी हा राजीनामा देतो आहे कारण… मी मागील ८ वर्षांपासून एक कार्यकर्ता आहे पण मला कधीही काम करू दिलं नाही आणि ही व्यथा प्रत्येक शिवसेना चित्रपट सेनेच्या सदस्याची आहे. ३ वर्षात चित्रपट सेनेची साधी मीटिंग झाली नाही. 4 वर्षात चित्रपट सेनेनी काहीही काम केलेलं नाही. शिवाय इथे कोणता अजेंडा नाही,' अशी नाराजी परब यांनी व्यक्त केली आहे. पुढे त्यांनी आदेश बांदेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

'आपले चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांना साडी वाटण्यापासून फुरसत मिळत नाही, ते काय काम करणार. त्यांना किती जवाबदारी दिल्या आहेत. सिद्धिविनायक, अंधेरी स्पोर्ट क्लब एवढ्या जबाबदाऱ्या दिल्यानंतर त्यांचं लक्ष चित्रपट सेनेवर कसं राहणार. जर त्यांना कामच करायचं नव्हतं तर मग त्यांना आमच्या डोक्यावर का बसवलत उद्धव साहेब…' असा सवाल त्यांनी केला आहे.

पुढे ते म्हणतात, 'आदेश बांदेकर चित्रपट सृष्टीतील कधी कोणता ममुद्दा उचलत नाहीत. कधीही बांदेकरांना फोन केला तर ते काहीही बोलत नाहीत. शिवसेना चित्रपट सेनेच वजन संपल आहे सिनेसृष्टीत. मी वरळीत राहतो, जो विभाग आहे आदित्य साहेबांचा आहे. तिथे ही आम्हाला मान दिला जात नाही. शिवसेनेचे नेते ही इतर पक्षाच्या लोकांची काम करतात पण आमचं काम करत नाही.' असे परब यांचे म्हणणे आहे. परब यांच्या राजीनाम्या नंतर शिवसेनेच्या चित्रपट सेनेतही चांगलीच फूट पडल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.