इंडियन आयडलच्या महाअंतिम सोहळ्यात थिरकणार अमृता, उद्या ठरणार महाविजेता..

सोनी मराठीवरील 'इंडियन आयडल मराठी' या संगीत महापर्वाचा विजेता उद्या ठरणार असून या सोहळ्यात अमृता खानविलकरसह अनेक कलाकार..
indian adol marathi finale
indian adol marathi finalesakal
Updated on

Tv Entertainment: 'इंडियन आयडल मराठी' या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. 'अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा' अशी टॅगलाईन असलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून स्पर्धक आले होते. सध्या या महापर्वाच्या महाअंतिम सोहळ्याची जोरदार चर्चा आहे. या पर्वातील टॉप ५ स्पर्धक तोडीस तोड सादरीकरण करत असताना नेमकं विजेतेपद कोण पटकावणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (indian idiol marathi finale)

indian adol marathi finale
प्राजक्ता माळीला चाहता म्हणतोय... 'ओगं माझं पिल्लू', एकाने तर चक्क...

या पर्वत विजेतेपदासाठी आता सुरांची टक्कर बघायला मिळते आहे. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरू झाली आहे. जगदीश चव्हाण, प्रतीक सोळसे, सागर म्हात्रे, श्वेता दांडेकर आणि भाग्यश्री टिकले हे पाच स्पर्धक अंतिम फेरीत पोचले आहेत. १८, १९ आणि २० एप्रिल असा तीन दिवस हा सोहळा चालणार आहे. त्यापैकी कालच्या भागात या सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी स्पर्धकांनी अक्षरशः आपल्या गायकीने भंडावून सोडले. आजवर स्पर्धकांना मार्गदर्शन करणारे तरुण संगीतकार अजित परब (ajit parab)याने आपल्या गायकीने अधिकच रंगात आणली.

आज होणाऱ्या भागात प्रेक्षकांची अधिकच उत्सुकता ताणली जाणार आहे. हिंदी गीते, लोकगीते, शास्त्रीय संगीत अशा नाना प्रकारच्या संगीताने हा सोहळा सजणार आहे. आजच्या भागात अभिनेत्री अमृता खानविलकर (amruta khanvilkar) या सोहळ्याला भेट देणार असून तिच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने लावणी देखील सादर करणार आहे. 'चंद्रमुखी' (chandramukhi) हा तिचा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाला 'अजय अतुल' यांनी संगीत दिले आहे. याच चित्रपटातील 'बाई गं' या बैठकीच्या लावणीवर अमृता थिरकणार आहे.तर २० एप्रिल रोजी या 'महाराष्ट्राचा आवाज' कोण हे आपल्याला कळेल. (amruta khanvilkar performed in indian idol marathi)

indian adol marathi finale
कसं असतं कलाकारांचं 'पडद्यामागचं विश्व' मिलिंद गवळींची खास पोस्ट..

नाशिक जिल्यातला निफाडचा जगदीश, दिंडोरीचा प्रतीक, पनवेलचा सागर, वसईची श्वेता आणि नागपूरची भाग्यश्री टिकले या स्पर्धकांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर, परीक्षकांच्या गुणांनी आणि प्रेक्षकांच्या मताच्या आधारे टॉप ५ मध्ये बाजी मारली आहे. प्रत्येकाची आवाजाची शैली, सादरीकरणाची पद्धत इतरांपेक्षा वेगळी आहे. टॉप १४ मधून बाजी मारलेल्या या शिलेदारांनी रसिकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या पर्वाचे परीक्षण अजय अतुल यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()