Amruta Subhash : 'निर्माते माझ्याकडे अभिनेत्री म्हणून पाहत नाहीत'

कुठल्याही साच्यात न अडकता अमृता नेहमीच विविधांगी भूमिका साकारण्यावर भर देते.
amruta subhash
amruta subhashinstagram
Updated on

आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकणारी हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष Amruta Subhash. अमृताने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये देखील आपली वेगळी ओळख निर्माण केली. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'बॉम्बे बेगम' Bombay Begums आणि 'सेक्रेड गेम्स 2' Sacred Games 2 या वेब सीरिजमधील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. दिवंगत दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'दिठी' या चित्रपटामध्ये अमृताने प्रमुख भूमिका साकारली आहे. अमृता नेहमी वेब सीरिज आणि मालिकांमध्ये आव्हानात्मक भूमिका साकारण्यावर भर देते. अशा भूमिका निवडण्यामागचे रहस्य अमृताने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत उलगडले आहे. (Amruta Subhash says that filmmakers are not slotting her as an actor)

या मुलाखतीत अमृता म्हणाली, 'चित्रपटाचे किंवा वेब सीरिजचे मेकर्स माझ्याकडे केवळ अभिनेत्री म्हणून पाहात नाहीत. तसेच ते ठराविक किंवा साचेबद्ध भूमिकेसाठी माझा विचार करत नाहीत, या गोष्टीचा मला आनंद वाटतो. मराठी किंवा हिंदी अशी सीमा मी कधीही काम करताना आखली नाही. इथे सर्वजण स्वत:मधील सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करतात. मराठी आणि हिंदीसोबतच मी इतर भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. भूमिकेचा आशय जर चांगला असेल तर चांगला कलाकारदेखील चमकतो.'

amruta subhash
सुष्मिताच्या लेकीने केला बॉयफ्रेंडबद्दल खुलासा

अमृताला अभिनयाचा वारसा तिच्या आईकडून म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांच्या कडून मिळाला. अमृताने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे शिक्षण घेतले. हिंदी, जर्मनी नाटकांमध्ये तिने काम केले आहे. अभिनेत्री भक्ती बर्वे यांचे प्रसिद्ध नाटक 'ती फुलराणी' मध्ये अमृताला प्रमुख भूमिका करण्याची संधी मिळाली. 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'श्वास'या चित्रपटामधून अमृताने रूपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर हापूस, अजंठा या मराठी चित्रपटांमध्ये अमृताने काम केले. 'गली बॉय' या सुपरहिट हिंदी चित्रपटामुळे तिला देशभरात विशेष ओळख मिळाली.

amruta subhash
कोरोनामुळे 'या' मराठी कलाकारांनी गमावला जीव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.