ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार Dilip Kumar यांनी बुधवारी जगाचा निरोप घेतला. ते ९८ वर्षांचे होते. बॉलिवूडच्या या दिग्गज कलाकाराच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियाद्वारे अनेक सेलिब्रिटींनी दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'अभिनयाची संस्था हरपली', अशा शब्दांत अभिनेते अमिताभ बच्चन Amitabh Bachchan यांनी दु:ख व्यक्त केलं. 'जेव्हा कधी भारतीय सिनेमाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा दिलीप कुमार यांच्या आधी आणि दिलीप कुमार यांच्या नंतर, असा उल्लेख त्यात झाला पाहिजे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याचं बळ मिळो', असं ट्विट बिग बींनी केलंय. (An institution has gone film industry pay tribute to the tragedy king dilip kumar)
'भारतीय सिनेसृष्टीचं एक युग संपुष्टात आलं. दिलीप कुमार साहब यांच्या निधनाने अतीव दु:ख झाले. ते सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनयाची संस्था आणि राष्ट्रीय खजिना होते. अनेक दशकं त्यांनी जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं', असं ट्विट दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांनी केलं. अजय देवगणनेही दिलीप कुमार यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
१९ डिसेंबर १९२२ मध्ये पेशावरमध्ये (पाकिस्तान) जन्म झालेल्या दिलीप कुमार यांचे मूळ नाव मोहम्मद युसूफ खान आहे. हिंदी सिनेसृष्टीत येण्यासाठी त्यांनी आपले नाव बदलून दिलीप कुमार असे ठेवले होते. १९४४ मध्ये त्यांनी 'ज्वार भाटा' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण दिलीप कुमार यांना खरी ओळख १९४७ मध्ये आलेल्या 'जुगनू' सिनेमाने दिली. या सिनेमानंतर दिलीप कुमार यांनी मागे वळून पाहिलेच नाही. १९५१ मध्ये आलेला दिदार आणि १९५५ मध्ये आलेला 'देवदास' या सिनेमांमुळे त्यांना ट्रेजेडी किंग या नावाने ओळखले जाऊ लागले. १९६० मध्ये आलेल्या 'मुघल-ए-आझम' हा सिनेमा हिंदी सिनेसृष्टीतला एव्हरग्रीन सिनेमा म्हणून ओळखला जातो. हिंदी सिनेसृष्टीचा इतिहास सांगताना या सिनेमाचा उल्लेख आवर्जून केला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.