Anant Ambani And Radhika Merchant : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या लाडक्या लेकाचं अनंत अंबानीचं प्री वेडिंग हे सध्या सोशल (Anant Radhika Pre Wedding) मीडियावर जोरदार चर्चेत आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत समाविष्ट असणाऱ्या मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) अनंत-राधिकाच्या प्री वेडिंगविषयीच्या विविध बातम्या समोर येत आहेत.
या वर्षी अनंत अन् राधिकाचं वेडिंग चर्चेत असणार आहे. गुजरातमधील (Anant Ambani Radhika Wedding News) जामनगरमध्ये या दोघांच्या प्री वेडिंगचा सोहळा पार पडणार आहे. त्याला जगभरातून पाहुणे मंडळी येणार आहे. आता अंबानींच्या घरचं लग्न असल्यानं त्या लग्नाची सगळीकडे चर्चा आहे. लग्नात पाहुणे मंडळींचे स्वागत कसे केले जाणार त्यांना काय उपहार देण्यात येणार, त्यांच्यासाठी कोणत्या प्रकारच्या डिशेस असणार याविषयीची माहिती आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
भारतीय चित्रपट विश्वातील अनेक सेलिब्रेटी या सोहळ्याला हजेरी लावणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जागरणनं याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे. अनंत अन् राधिकाच्या प्री वेडिंगची निमंत्रण पत्रिकाच मुळी आठ पानांची असल्याचे सांगण्यात येत आहे. यावरुन हा सोहळा किती भव्य दिव्य असणार याची कल्पना करता येईल. याशिवाय येणाऱ्या पाहुण्या मंडळींसाठी तब्बल अडीच हजारांहून अधिक डिशेस असणार आहेत.
गुजरातमधील जामनगर येथे एक ते तीन मार्च दरम्यान राधिका आणि अनंतचा प्री वेडिंग (Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding News)सोहळा पार पडणार आहे. येणाऱ्या पाहुणे मंडळींच्या स्वागतात कुठेही कमतरता येणार नाही याची काळजी अंबानी परिवाराकडून घेतली जात आहे. असं म्हटलं जात आहे की, अनंत आणि राधिकाचं हे ग्रँड वेडिंग भारतातलं सर्वाधिक ग्रँड वेडिंग असणार आहे. त्याची चर्चा पुढे कित्येक दिवस सुरु राहिल. केवळ बॉलीवूड नाही तर उद्योग जगतातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
अनंत अंबानी आणि राधिकाच्या प्री वेडिंगला जे सेलिब्रेटी हजर राहणार आहेत त्यांची यादी समोर आली होती. त्यात मेटाचे सीइओ मार्क झुकरबर्ग, टेड पिकचे सीईओ मॉर्गन स्टॅनली, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, डिझ्नेचे सीइओ बॉब आयगर, ब्लॅक रॉकचे सीइओ लॅरी फिंक, अॅडनॉकचे सीइओ सुलतान अहमद अल जबार, अडोबचे सीईओ शंतनु नारायण यांचा समावेश होता.
फॅन पेज वरुन आठ पानांची निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आली आहे. त्याचा व्हिडिओ शेयर करण्यात आला आहे. त्यात त्या प्री वेडिंगमधील कार्यक्रम आणि ड्रेस कोड याविषयी माहिती देण्यात आली आहे. एक मार्च पासून या सोहळ्याला सुरुवात होणार आहे.
दोन मार्चला दोन इव्हेंट होणार आहे. एका इव्हेंटचे नाव ए वॉक ऑन द वाईल्ड साईड असे असून दुसऱ्या इव्हेंटचे नाव मेला असे आहे. बॉलीवूडमधील शाहरुख खान, अमिताभ बच्चन, जान्हवी कपूर, यांच्यासह हॉलीवूड गायिका रिहाना देखील या सोहळ्यात सहभागी होणार असल्याची माहिती आहे.
ए वॉर ऑन द वाईल्ड साईड कार्यक्रमातून निमंत्रित पाहुण्यांना वेगळा ड्रेस परिधान करावा लागणार आहे. त्या कार्यक्रमाची थीम जंगल अशी असणार आहे. दुसऱ्या कार्यक्रमातही विशेष ड्रेस कोडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात सहभागी होणाऱ्यांना खास डान्सिंग शूज घालावे लागणार आहेत. याशिवाय उर्वरित कार्यक्रमांना पारंपरिक कपड्यांची वेशभूषा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
ही आहे कार्यक्रमांची लिस्ट..
एक मार्च रोजी - अॅन इव्हेनिंग इन इंग्लंड (An Evening in Everland) हा कार्यक्रम पार पडणार असून त्यामध्ये नाचगाणी, व्हिज्युअल आर्टिस्ट्री आणि स्पेशल सरप्राईज असणार आहे.
दोन मार्च रोजी - अ वॉक ऑन द वाईल्डसाईड (A Walk on the Wildside)
यामध्ये वंतारा रेस्क्यु आणि रिहॅबिटीलायझेशन सेंटरविषयी माहिती दिली जाणार आहे. मेला रो मधून नाचगाण्यांची रेलचेल असणार आहे.
तीन मार्च रोजी - टस्कर ट्रेल्स या कार्यक्रमात पाहुण्यांसाठी खास भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी हस्ताक्षर नावाचा कार्यक्रमही पार पडणार आहे. असं म्हटलं जात आहे की, एक हजार पाहुणे या सोहळ्यासाठी विशेष निमंत्रित असून त्यात बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांच्या नावाचाही समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.