बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांड्ये(Ananya Panday) त्या स्टार किड्सपैकी एक आहे जी आजपर्यंत अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे ट्रोल झाली आहे. सोशल मीडियावर आपल्या स्ट्रगलविषयी तिनं केलेल्या वक्तव्यांमुळे तिला जरा जास्तच धारेवर धरलं गेलं आहे. एका मुलाखतीत अनन्या पांड्ये म्हणाली होती,''स्टार किड्सना देखील सिनेइंडस्ट्रीत स्ट्रगल करावं लागतं. आता खरंतर अनन्या या आपल्या वक्तव्याला मागे सोडून इंडस्ट्रीत खूप पुढे निघून गेली आणि आपली ओळख निर्माण करण्यासाठी मेहनत करु लागली आहे. आज अनन्या पांडेनं बॉलीवूडमध्ये आपलं चांगलं नाव कमावलं आहे. आता ती करिअरची एक-एक पायरी वर चढताना दिसत आहे.(Ananya Panday Faced Casual Sexism)
खूप लोकांचा असा समज आहे की स्टार किड्स असल्यावर सिनेक्षेत्रातील प्रवास खूप सोपा होतो. सगळं सहज मिळत जातं. त्यांना कुठल्याच प्रकारच्या क्रिटिसिझमचा सामना करावा लागत नाही. पण इथेच सगळे चुकतात. कारण अनन्या पांडेनं तिच्या नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं आहे की,'' स्टार किड्सला देखील क्रिटिसिझमला सहन करावं लागतं''. 'द रणवीर शो' मध्ये अनन्या पांडेनं सांगितलं की,''तिनं आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांत सेक्सिझमचा(Sexism) खूप सामना केला आहे. गोष्ट इथवर पोहोचली होती की अभिनेत्रीला 'बूब जॉब' करायला सांगितलं होतं. बूब जॉब म्हणजे स्तनांना परफेक्ट साइजमध्ये आणण्यास सांगितलं गेलं होतं.
अनन्या पांडे म्हणाली,''लोकांनी मला फेस,बॉडी सोबतच बूब जॉब करुन घेण्याचाही सल्ला दिला होता, जो माझ्यासाठी मनाला खूप वेदना देणारा ठरला. जेव्हा मी सिनेमात काम करायला सुरुवात केली तेव्हा लोकांच्या तोंडातून हे सगळं सहज उपदेश करताना बोललं जायचं. कधी थेट कुणी म्हटलं नाही,पण नकळत मला सांगितलं जायचं. लोक म्हणायचे,थोडं अंगानं भर,वजन वाढवायची गरज आहे तुला. सगळ्यात वाईट गोष्ट ती असते जेव्हा तुम्ही कोणाच्या तरी बॉडीला जज करता. शरीरावर कमेंट करता''.
चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेला करण जोहरनं 'स्टुडंट ऑफ द ईयर २' सिनेमातून लॉंच केलं होतं. टायगर श्रॉफसोबत अनन्यानं स्क्रीन शेअर केली होती. अनन्या पांडे म्हणाली,''मला कुणीही कधी काम देतील असं आश्वासन नव्हतं केलं. माझ आधीपासूनच अभिनेत्री बनायचं स्वप्न होतं. पण मला हे माहित नव्हतं की अभिनेत्री मी बनणार कशी,काय करावं लागतं त्यासाठी. माझ्यासाठी प्रवास खूप सोपा असेल असा विचार माझ्या मनात कधी आलाच नाही. आणि अर्थात तो सोपा नव्हताच''. अनन्या पांडे लवकरच विजय देवरकोंडासोबत 'लाइगर' सिनेमात दिसणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.