Ananya Pandey Latest News अनन्या पांडे (Ananya Pandey) व विजय देवरकोंडा स्टारर लिगर चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. चित्रपटाचे कलाकारही प्रमोशनसाठी कोणतीही कसर सोडत नाही आहे. केवळ ऑनस्क्रीन केमिस्ट्रीच नाही तर ऑफस्क्रीन केमिस्ट्रीने दोघेही चाहत्यांना आकर्षित करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. प्रमोशनच्या उपक्रमात एक पाऊल पुढे टाकत अनन्या पांडेने चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये तेलुगूमध्ये भाषण देऊन सर्वांची मने जिंकली.
मुंबई आणि हैदराबादमध्ये ट्रेलर लॉन्च केल्यानंतर अनन्या आणि विजय लीगरच्या प्रमोशनसाठी देशातील मल्टीसिटी टूरवर आहेत. या कलाकारांनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईच्या लोकल ट्रेनमधूनही प्रवास केला आहे. अनन्या पांडेने तिच्या तेलगू भाषणाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘वारंगलमधील तेलुगू भाषण, मी तुम्हाला प्रेम देण्याचा प्रयत्न केला. आशा आहे की तुम्ही आम्हाला असेच प्रेम द्याल’, असे अनन्याने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
अनन्याने (Ananya Pandey) तेलुगूमध्ये भाषण देऊन चाहत्यांशी बराच वेळ जोडून राहण्याचा प्रयत्न केला. अभिनेत्रीच्या या प्रयत्नाला उपस्थित प्रेक्षकांनीही दाद दिली. तेलुगू इंडस्ट्रीत नाव कमावण्याची इच्छा व्यक्त करीत अनन्याने लोकांना तिचे काम स्वीकारण्याची विनंती केली. पुरी जगन्नाध दिग्दर्शित, चार्मी कौर आणि करण जोहर निर्मित लिगरकडून विजय देवरकोंडा व अनन्या पांडेला खूप अपेक्षा आहे. लिगर हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरेल, असे विजय देवरकोंडा याने एका कार्यक्रमात सांगितले आहे.
लिगर हा एक स्पोर्ट्स ड्रामा आहे. ज्यामध्ये विजय देवरकोंडा (Vijay Devarakonda) एका मिक्स्ड मार्शल आर्ट्स (MMA) फायटरची भूमिका साकारत आहे. ज्याला बोलताना (स्पीकिंग डिसएविलिटी) त्रास होतो. वैयक्तिक जीवनात अनेक आव्हानांना तोंड देत ही व्यक्तिरेखा युद्धाच्या खेळात कशी चमत्कारिक कामगिरी करते हे चित्रपटाच्या कथेतून दाखवण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.