माधुरी- अनिल कपूरच्या आयकॉनिक 'तेजाब'चा रीमेक; जाणून घ्या याविषयी

'तेजाब'चे दिग्दर्शक एन.चंद्रा मात्र रीमेक बनणार असल्यानं नाराज आहेत असं म्हटलं जात आहे.
Anil Kapoor and Madhuri Dixit's iconic hit Tezaab to be remade, producer Murad Khetani confirms
Anil Kapoor and Madhuri Dixit's iconic hit Tezaab to be remade, producer Murad Khetani confirmsGoogle
Updated on

माधुरी दिक्षित (Madhuri Dixit)आणि अनिल कपूर (Anil Kapoor)चा आयकॉनिक सिनेमा 'तेजाब'(Tezaab)चा लवकरच रीमेक(Remake) आपल्या भेटीला येत आहे. निर्माते मुराद खेतानी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना ही तेजाबच्या रीमेकचं कन्फर्मेशन दिलं आहे. निर्माते मुराद खेतानी यांनी तेजाबचे दिग्दर्शक एन.चंद्रा यांच्यासोबत कागदोपत्री सगळा व्यवहार करुन यासंदर्भातले हक्क आपल्या नावावर करून घेतले आहेत. लवकरच या सिनेमाच्या प्री-प्रॉडक्शनला सुरुवात होईल असंही खेतानी यांनी सांगितलं आहे.

Anil Kapoor and Madhuri Dixit's iconic hit Tezaab to be remade, producer Murad Khetani confirms
Plastic surgery नंतर कन्नड अभिनेत्रीचा खाजगी रुग्णालयात मृत्यू

तेजाबचा रीमेक बनविण्यासंदर्भात स्पष्टिकरण देताना निर्माते खेतानी म्हणाले,''हा एक आयकॉनिक सिनेमा आहे. आम्ही याचा रीमेक करताना सध्याच्या काळाला अनुसरून कथानकात काही बदल करणार आहोत''. खेतानी 'तेजाब'चा रीमेक बनवण्यासंदर्भात खूपच उत्सुक आहेत आणि अर्थात त्यांना सिनेमा कशा पद्धतीनं बनवायचा आहे या संदर्भातले त्यांचे विचार स्पष्ट आहेत. पण अनिल-माधुरी दिक्षितच्या तेजाबचे दिग्दर्शक एन.चंद्रा यांना या सिनेमाच्या रीमेक संदर्भात विचारलं असता त्यांनी स्पष्टपणे काहीच उत्तर दिलं नव्हतं.

Anil Kapoor and Madhuri Dixit's iconic hit Tezaab to be remade, producer Murad Khetani confirms
बॉलीवूड तोंडावर आपटलं; 'साऊथ' नंतर आता 'पंजाबी' सिनेमांचा बॉक्सऑफिसवर कब्जा

चंद्रा म्हणाले होते,''एखाद्या दर्जेदार कलाकृतीला आपण हात लावू शकत नाही,किंवा त्यांच्याशी छेडछाड करू शकत नाही. त्या कलाकृती या एखाद्या ठराविक काळानुरुप बनलेल्या असतात, म्हणजेच त्या-त्या काळाशी साधर्म्य साधणारं त्यांचं कथानक असतं. त्यामुळे मुळ कथेला आपण हात लावू शकत नाही. 'तेजाब' हा त्या काळातील सामाजिक पर्वावर आधारित सिनेमा होता. आणि आपण त्या सामाजिक पर्वाचा रीमेक करू शकत नाही. आपण उगाचच सिनेमा बनवण्याच्या नावाखाली काहीही त्यात कोंबून प्रतिकृती बनवण्याच्या नादात कदाचित प्रयोग फसू देखील शकतो''.

Anil Kapoor and Madhuri Dixit's iconic hit Tezaab to be remade, producer Murad Khetani confirms
'तारक मेहता...' मधील अभिनेत्याच्या निधनाची अफवा; अखेर सत्य समोर आलं

चंद्रा पुढे म्हणाले होते,''तेजाब हा त्यावेळचा ब्लॉकबस्टर सिनेमा होता. त्या सिनेमाचा रीमेक बनू शकत नाही. मग अगदी तो मला बनवायचा असला तरी किंवा इतर कुणी त्या सिनेमाच्या मूळ कथेला छेडू शकत नाही''.

Anil Kapoor and Madhuri Dixit's iconic hit Tezaab to be remade, producer Murad Khetani confirms
अनुष्काची घर-करिअर सांभाळताना दमछाक; म्हणाली,'एका आईच्या अडचणी समजून घ्या'

'तेजाब' १९८८ साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमात अनिल कपूर,माधुरी दिक्षितसोबतच चंकी पांडे,अनुपम खेर,जॉनी लिव्हर असे अनेक कलाकार होते. तेजाबमध्ये जयवंत वाडकर, विजय पाटकर,सुहास जोशी अशा मराठी कलाकारांचाही भरणा होता. त्या सिनेमातील माधुरीच्या एक,दो,तीन या गाण्यानं आजच्या पिढीलाही आपल्या तालावर नाचायला भाग पाडलं आहे. त्यावेळेस तर त्या गाण्यानं अक्षरशः वेड लावलं होतं. आणि तेव्हाचं ते हीट नंबर ठरलं होतं. १९८८ सालात सगळ्यात जास्त कमाई केलेला तो सुपरहिट सिनेमा ठरला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.