Viral Photo: 'अरे हा तर अमेरिकेतला अनिल कपूर'! एकदम 'झकास'

जॉननं त्याच्या इंस्टावर काही फोटो शेयर केले आहे. ते पाहताच नेटकऱ्यांनी त्या फोटोंची तुलना बॉलीवूडचे अभिनेते अनिल कपूर यांच्याशी केली आहे.
John Effer photo
John Effer photo esakal
Updated on

Anil Kapoor News: सोशल मीडियावर बॉलीवूडच्या सेलिब्रेटींच्या डुप्लिकेटची नेहमीच चर्चा होताना दिसते. आलिया भट्ट, प्रियंका चोप्रा, ऐश्वर्या रॉय, क्रिती सेनॉन याशिवाय सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान आणि आता अनिल कपूर (Bollywood News) यांच्या डुप्लिकेट्सची चर्चा सोशल मीडियापर रंगलीय. बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांच्यासारखी दिसणारी ती व्यक्ती अमेरिकेतील आहे. एका जीममध्ये कोच म्हणून काम करणाऱ्या जॉन एफरचा तो (social media viral news) फोटो आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

जॉननं त्याच्या इंस्टावर काही फोटो शेयर केले आहे. ते पाहताच नेटकऱ्यांनी त्या फोटोंची तुलना बॉलीवूडचे अभिनेते अनिल कपूर यांच्याशी केली आहे. कित्येकांनी त्याच्या फोटोवर हा तर अमेरिकेतील अनिल कपूर अशी कमेंट केली आहे. अनिल कपूर यांच्या चाहत्यांना देखील तो फोटो पाहताच धक्का बसला आहे. एवढी बॉडी बिल्डिंग करणारा अमेरिकेतील अनिल कपूर आहे तरी कोण हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक असल्याचे दिसून आले आहे.

जॉननं तो फोटो शेयर करताना लिहिलं आहे की, मी बॉलीवूडमधील स्टार अभिनेते अनिल कपूर यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे. जॉननं त्याचा फोटो अनिल कपूर यांना टॅगही केला आहे. अनिल कपूर यांचा 90 च्या दशकातील चित्रपटांमध्ये जो लूक होता त्याची कॉपी करुन जॉननं ते फोटो अनिल यांना टॅग केले आहे. ते फोटो पाहून अनिल यांच्या चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

John Effer photo
Dimple Kapadia: 'एवढी मोठी अभिनेत्री अडीच सेकंदच ब्रम्हास्त्रमध्ये दिसली'!

जॉनच्या त्या फोटोवर एका नेटकऱ्यानं त्याला आता तुला अनिल कपूर यांच्या वन टू का फोर गाण्यावर डान्स करावा लागेल. अशी गंमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे. दुसऱ्यानं लिहिलं आहे, मी तर तुझा फोटो पाहून फसलो. तू सेम टू सेम अनिल कपूर यांच्यासारखा दिसतो आहे.

John Effer photo
Emraan Hashmi: इम्रान हाश्मीवर दगडफेक, पहलगाममधील धक्कादायक प्रकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.