Anil Kapoor Court Matter : 'खबरदार यापुढे जर माझे नाव, फोटो अन् आवाज यांची कॉपी केली तर....' अनिल कपूर यांनी घेतली कोर्टात धाव!

बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर हे आता वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आले आहे.
Actor Anil Kapoor moves a suit in Delhi High Court, seeking a permanent injunction restraining
Actor Anil Kapoor moves a suit in Delhi High Court, seeking a permanent injunction restraining
Updated on

Actor Anil Kapoor moves a suit in Delhi High Court, seeking a permanent injunction restraining : बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर हे आता वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. वयाची साठी पार केल्यानंतर सेटवरील सर्वाधिक उत्साही अभिनेते म्हणून अनिल कपूर यांचे नाव घेतले जाते. आता या अभिनेत्यानं काही विशिष्ट गोष्टींसाठी कोर्टात धाव घेतली आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

मीडियामध्ये आपल्या नावाचा, फोटोचा अन् व्हिडिओवरुन जे गैरप्रकार सुरु आहेत ते होऊ नयेत आणि त्यावरुन वेगळ्या प्रकारचे मेसेज फॉरवर्ड होऊन वेगळे वातावऱण तयार होऊ नये यासाठी अनिल कपूर यांनी कोर्टात धाव घेतल्याचे दिसून आले आहे. अनिल कपूर यांनी जे पाऊल उचलले आहे त्याची चर्चा होत आहे.

Also Read - Libya Flood : मृतदेहांचा रस्त्यावर खच,मदतीची केविलवाणी प्रतीक्षा, युद्धाच्या आगीतून बाहेर पडणारा लिबिया आता पूराच्या

एएनआयच्या ट्विटनुसार, अनिल कपूर यांनी त्यांच्या चाहत्यांना, नेटकऱ्यांना सणसणीत इशाराच दिला आहे. अनिलजींना दिल्लीच्या उच्च न्यायालयात याबाबत एक याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आपल्या फोटोचा, किंवा व्यक्तिमत्वाचा जाहीररित्या जर दुरुपयोग होत असेल तर तसे करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. याशिवाय कोणत्याही सामाजिक माध्यमांवर, चॅनेलवर प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याबाबत कायदेशीर कारवाईचा इशाराही अनिल कपूर यांनी दिला आहे.

Actor Anil Kapoor moves a suit in Delhi High Court, seeking a permanent injunction restraining
Ganesh Festival 2023 : 'तू इस्लामच्या नावाला कलंक', सलमानला कुटूंबात समवेत आरती करणं पडलं महागात!

यापूर्वी काही मोबाईल अॅप्स, सोशल मीडिया चॅनेल्स यावर त्यांचे नाव, फोटो आणि स्वाक्षरी याच्या माध्यमातून प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे समाजात वेगळा संदेश जाऊन त्याचा अपप्रचार होत आहे. यावर येत्या काळात न्यायधीशांकडून या याचिकेवर निर्णय दिला जाणार असल्याचे एएनआयच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Actor Anil Kapoor moves a suit in Delhi High Court, seeking a permanent injunction restraining
Shah Rukh Khan: जवानचं यश फॅन्ससोबत साजरं! मन्नतच्या गॅलरीबाहेर येऊन शाहरुख खानने खास अंदाजात मानले आभार

अनिल कपूर यांनी आपल्या त्या याचिकेमधून कायमस्वरुपी त्यांचे फोटो, स्वाक्षरी, आवाज, व्हिडिओ याचा त्यांच्या परवानगीशिवाय वापर करणाऱ्यांवर कारवाई केली जावी. असे त्या याचिकेमध्ये म्हटले आहे. आपल्या नावाचा वापर जर कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक हेतूनं किंवा वैयक्तिक फायद्यासाठी होत असेल तर त्यावर कारवाई केली जावी. असे अनिलजींचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.