Animal Box Office Collection Day 2: बॉक्स ऑफीसच्या निवडणुकीत अ‍ॅनिमलने मारली बाजी! आकडा 100 कोटींच्या पार

अ‍ॅनिमलने रिलिजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 60 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
Animal Box Office Collection Day 2: बॉक्स ऑफीसच्या निवडणुकीत अ‍ॅनिमलने मारली बाजी! आकडा 100 कोटींच्या पार
Updated on

Animal Box Office Collection Day 2: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल' हा सिनेमा 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. सध्या सर्वत्र अ‍ॅनिमल'ची क्रेझ पहायला मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर अ‍ॅनिमलची स्पर्धा होती ती विकी कौशलच्या सॅम बहादूर चित्रपटासोबत.

या दोन्ही चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता दोन्ही चित्रपटांना प्रेक्षक आणि समीक्षकांचे चांगले प्रेम मिळत मिळाले मात्र कमाईच्या बाबतीत अ‍ॅनिमलने सॅम बहादूरला खुपच मागे टाकले आहे.

अ‍ॅनिमलने रिलिजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 60 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

Animal Box Office Collection Day 2: बॉक्स ऑफीसच्या निवडणुकीत अ‍ॅनिमलने मारली बाजी! आकडा 100 कोटींच्या पार
Jitendra Joshi: "माझ्या पत्नीचे स्वप्न सत्यात उतरलं", जितेंद्र जोशीने मानले अभिषेक बच्चनचे आभार

पहिल्या दिवसाच्या कमाईनंतर आता दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. विकेंडच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाच्या कमाईचा आलेख उंचावला आहे.

पहिल्या दिवशी 63.8 करोड कमाई करणाऱ्या अॅनिमलनं दुसऱ्या दिवशी 66 कोटींचा टप्पा पार केला आहे.

या कमाईसोबतच दोन दिवसात या चित्रपटाने एकून 129.80 करोडची कमाई केली आहे. त्यामुळे आता रणबीरचा अ‍ॅनिमल हा या वर्षीचा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा असू शकतो अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Animal Box Office Collection Day 2: बॉक्स ऑफीसच्या निवडणुकीत अ‍ॅनिमलने मारली बाजी! आकडा 100 कोटींच्या पार
Sachin Tendulkar On Sam Bahadur : 'तुम्ही प्रत्येकानं सॅम बहादुर पाहायलाच हवा, कारण...'! क्रिकेटचा देव भारावला

रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदान्ना यांच्यासह अनेक कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

'अ‍ॅनिमल' चित्रपटाची कथा बाप आणि मुलाच्या प्रेमावर आधारित आहे. चित्रपटात खुपच अॅक्शन पहायला मिळते. तर चित्रपटातील रणबीरच्या वेगळ्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.