Animal Box Office Collection Day 3: 'अ‍ॅनिमल'नं केली मोठमोठ्या सिनेमांची शिकार, तिसऱ्या दिवशी किती कोटींची केली कमाई?

'अ‍ॅनिमल' सिनेमा 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.
Ranbir Kapoor Animal Movie
Ranbir Kapoor Animal MovieEsakal
Updated on

Animal Box Office Collection Day 3: गेल्या काही दिवसांपासून ज्या सिनेमाची सर्वांना प्रतिक्षा होती तो 'अ‍ॅनिमल' सिनेमा 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये एकच गर्दी केली आहे. हा सिनेमा रणबीरच्या करियरमधला सर्वात जास्त आणि वेगाने कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले असून चित्रपटाने तुफान कमाईचा वेग धरला आहे.

63 कोटींहून अधिकचे कलेक्शन करत या चित्रपटाने धमाकेदार ओपनिंग केली होती. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शनात हा अॅक्शन-ड्रामा चित्रपट रोज नवनवीन रेकॉर्ड करत आहे. विकेंडला तर अ‍ॅनिमल'ने कमाल केली आहे. रिलीजच्या तिसऱ्या दिवशी चित्रपटाने किती कोटींचा गल्ला जमवला ते येथे जाणून घेऊया.

Ranbir Kapoor Animal Movie
Ashok Saraf: "गर्व म्हणा हवं तर..", अशोक सराफ यांच्याविषयी अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

Animal च्या कमाईवर नजर टाकली असता, चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी 63.8 कोटी रुपयांची तगडी ओपनिंग दिली होती. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी या चित्रपटाने तब्बल 66.27 कोटींची कमाई केली.

आता रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'Animal' ने रिलीजच्या तिसर्‍या दिवशी म्हणजे रविवारी 72.50 कोटी रुपयाची कमाई केली आहे. या बरोबर 'अॅनिमल' चित्रपटाने तीन दिवसांत एकूण 202.57 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जगभरातील कमाई 340 कोटींवर गेली आहे.

रिलीजच्या अवघ्या तीन दिवसात ‘अ‍ॅनिमल’ने 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. यासोबतच रणबीरच्या चित्रपटाने शाहरुख खानच्या जवान नंतर 200 कोटींच्या क्लबमध्ये सर्वात जलद प्रवेश करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. तर रणबीरने शाहरुख खानच्या पठाण आणि सलमान खानच्या टायगर 3 चा रेकॉर्ड मोडला आहे. तर अनेक हॉलिवूड चित्रपटांनाही मागे टाकले आहे.

Ranbir Kapoor Animal Movie
Anvita Phaltankar: गेल्या चार महिन्यांपासून... ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या मराठी अभिनेत्रीला मनस्ताप, काय घडलं नेमकं?

रणबीर कपूर व्यतिरिक्त बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना आणि अनिल कपूर यांनी 'अ‍ॅनिमल’मध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर तृप्ति डिमरी हिच्या अभिनयानेही प्रेक्षकांची मन जिंकली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.