Animal OTT Release: 'अ‍ॅनिमल' च्या ओटीटी प्रदर्शनावर अडवणूक, निर्मात्यांनीच घातली बंदी, नेमकं प्रकरण काय?

'अ‍ॅनिमल' च्या निर्मात्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतलीय
Animal OTT Release has been blocked by the producers cine 1 studios themselves
Animal OTT Release has been blocked by the producers cine 1 studios themselvesSAKAL
Updated on

Animal OTT Release: 2023 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'Animal' ने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड तोडले. या चित्रपटाने जगभरात 900 कोटींहून अधिक कमाई केली होती, मात्र 'अ‍ॅनिमल'च्या ओटीटी रिलीजबाबत वाद निर्माण झाला आहे.

हा चित्रपट २६ जानेवारी रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे, परंतु त्याआधी चित्रपटाचा सहनिर्माता असल्याचा दावा करणाऱ्या Cine 1 Studios ने OTT सह इतर चार प्लॅटफॉर्मवर त्याचे प्रदर्शन थांबवण्याची मागणी केली आहे.

चित्रपटाच्या डिजिटल स्ट्रीमिंगवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका Cine1 Studios ने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

Animal OTT Release has been blocked by the producers cine 1 studios themselves
Shivrayancha Chhava: कैलाश खेरच्या आवाजातलं छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे भव्यदिव्य गीत..!

सिने1 स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेडने सुपर कॅसेट इंडस्ट्रीज प्रायव्हेट (टी-सीरीज) वर गंभीर आरोप केले आहेत की, टी सीरीजने कराराचे उल्लंघन केले आहे आणि एक पैसाही दिला नाही.

प्रत्युत्तरात, सुपर कॅसेट्सने सांगितले की, याचिकाकर्त्याला 2.6 कोटी रुपये दिले गेले, ज्याचा तपशील न्यायालयाला उघड केला गेला नाही.

'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या निर्मितीसाठी दोन प्रॉडक्शन हाऊसने करार केला असल्याचे सिने१ स्टुडिओने न्यायालयाला सांगितले. करारानुसार, Cine1 ला 35 टक्के नफ्यात वाटा होता. परंतु हा वाटा सुपर कॅसेटने Cine1 स्टुडिओच्या मान्यतेशिवाय चित्रपटाची निर्मिती, प्रचार आणि रिलीज करण्यासाठी खर्च केला. आणि कोणताही तपशील शेअर न करता बॉक्स ऑफिस विक्रीवर नफा कमावला.

असे असूनही, सिने1 स्टुडिओला एक पैसाही दिला गेला नाही. चित्रपटाची कमाई, बॉक्स ऑफिस, त्याचे संगीत आणि सॅटेलाइट अधिकार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

सिने१ स्टुडिओ पुढे म्हणाले, "सुपर कॅसेट सर्व पैसे स्वतःच कमवत आहे. आम्हाला एक पैसाही दिला गेला नाही. माझे त्यांच्याशी खूप जुने नाते आहे, पण कराराचा सन्मान करण्याचा आदर त्यांच्यात नाही."

दरम्यान, सुपर कॅसेट्सच्या वतीने न्यायालयात हजर झालेले ज्येष्ठ वकील अमित सिब्बल म्हणाले की, "सिने1ने चित्रपटात एकही पैसा गुंतवला नाही. आणि सुपर कॅसेटनेच चित्रपट बनवण्याचा सर्व खर्च केला आहे. 2 ऑगस्ट 2022 रोजी त्यांनी चित्रपटातील सर्व हक्क सोडले. पण सिने1ने ही गोष्ट न्यायालयापासून लपवून ठेवली. त्यासाठी त्यांनी २.६ कोटी रुपयेही घेतले. त्यांनी चित्रपटात एक पैसाही गुंतवला नाही आणि तरीही त्यांना 2.6 कोटी देण्यात आले."

विशेष म्हणजे या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 जानेवारी रोजी होणार आहे. त्यामुळे 'अ‍ॅनिमल' २६ जानेवारीला २०२४ ला ओटीटीवर रिलीज होणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.