Akshay Kumar from Janwar and Ranbir Kapoor from Animal : कबीर सिंग, अर्जून रेड्डी सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या अॅनिमल नावाच्या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाणही आले आहे. सोशल मीडियावर अॅनिमलवर नेटकऱ्यांनी टीकाही केली आहे. त्याचे कारण हा चित्रपट बॉलीवूडमधील एका चित्रपटाची कॉपी आहे असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.
बाप लेकाच्या नात्यावर भाष्य करणारा चित्रपट म्हणून अॅनिमलकडे पाहिले जात आहे. बॉलीवूडमध्ये या विषयावर आधारित अनेक चित्रपट झाले आहेत. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यात अॅनिमल आणि काही चित्रपटांची तुलना होत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील तो फायटिंग सीन हॉलीवूडच्या ओल्ड बॉय मधील असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
Money and Mind पैसा हवाच पण मनाची श्रीमंती-समाजऋणाचे भानही हवे!
ज्यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारचा जानवर नावाचा चित्रपट पाहिला असेल त्यांना अॅनिमलची स्टोरीलाईन समजून जाईल. अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. या सगळ्यात एका व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ज्यात अॅनिमलमधील अनिल कपूर आणि रणबीर कपूर यांच्यातील तो सीन आणि दुसरीकडे वक्तमधील अमिताभ अक्षय कुमारमधील तो सीन याची तुलना करण्यात आली आहे.
अॅनिमलमध्ये रश्मिका रणबीरला म्हणते की, वडिलांप्रती त्याचं प्रेम हे प्रेम नसून तो एक आजार आहे. त्याच प्रमाणे अक्षय कुमारच्या त्या चित्रपटात करिश्मा कपूर त्याला म्हणते की, तू वडिल किंवा मी यांच्यापैकी एकाची निवड कर, तुला ती करावीच लागेल. हे दोन्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर आता नेटकरी, चाहते गोंधळून गेले आहेत आणि चर्चा करु लागले आहेत की रणबीरचा हा चित्रपट कॉपी पेस्ट चित्रपट तर नाही ना...
रणबीरचा अॅनिमल हा येत्या एक डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. त्याचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केलं असून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकींगला प्रेक्षकांचा, चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अॅनिमलच्या माध्यमातून रणबीर, बॉबी देओल, रश्मिका आणि अनिल कपूर हे पहिल्यांदाच एकत्रित स्क्रिन शेयर करणार आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अॅनिलमलच्या अॅडव्हान्स बुकींगला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे, खरंतर अॅनिमल आणि विकी कौशलचा सॅम बहादुर हे एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे. त्यात एकट्या अॅनिमलमनं अॅडव्हान्स बुकींगमध्ये बाजी मारली आहे. त्याच्या पावणेचार कोटींच्या तिकीटांची व्रिकी झाली आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करेल असा विश्वास मेकर्सनं व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.