Sandeep Reddy Vanga : '19 नॉमिनेशन' मिळुनही 'ॲनिमल' चा दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा नाराज! काय आहे कारण?

संदीप रेड्डी वांगाचे दिग्दर्शन असलेली ॲनिमल नावाची फिल्म ही बॉलीवूडमध्ये गेल्या वर्षी सर्वाधिक कलेक्शन करणारी तिसरी फिल्म ठरली.
Sandeep Reddy Vanga unhappy even after 19 Filmfare nominations
Sandeep Reddy Vanga unhappy even after 19 Filmfare nominationsesakal
Updated on

Sandeep Reddy Vanga unhappy even after 19 Filmfare nominations : संदीप रेड्डी वांगाचे दिग्दर्शन असलेली ॲनिमल नावाची फिल्म ही बॉलीवूडमध्ये गेल्या वर्षी सर्वाधिक कलेक्शन करणारी तिसरी फिल्म ठरली. त्याच्या पुढे शाहरुख खानची पठाण आणि सनी देओलची गदर २ नावाची फिल्म आहे. अशातच वेगवेगळ्या वादानं हा चित्रपट सतत चर्चेत राहिल्याचे दिसून आले आहे.

रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ॲनिमल या चित्रपटाला यंदाच्या वर्षीच्या अॅनिमल या चित्रपटाला १९ नामांकनं मिळाले आहेत. त्यामुळे ॲनिमल टीममध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र त्याच्या दिग्दर्शकानं त्यावर केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. त्यानं परखडपणे बॉलीवूड आणि बॉलीवूडमधील राजकारण यावर बोट ठेवले आहे. असं संदीप रेड्डी वांगा काय बोलला की ज्यामुळे त्याच्यावर नेटकऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली, हे आपण जाणून घेणार आहोत.

निमलमध्ये रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर, तृप्ती डिमरी, बॉबी देओल यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तब्बल आठशे कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याचे दिसून आले आहे. आता तर फिल्मफेयर पुरस्कारावर ॲनिलमनं मोहोर उमटविला आहे. या चित्रपटानं एक दोन नव्हे तर चक्क १९ नामांकनं मिळवून आपली ओळख नव्यानं करुन दिली आहे.

संदीप रेड्डी वांगानं फिल्मफेयर पुरस्कार आणि त्यातील राजकारण यावर परखडपणे मत व्यक्त केले आहे. दैनिक भास्करशी संवाद साधताना तो म्हणाला, जे कोणते पुरस्कार सोहळे आहेत त्यातून ते नेहमीच त्यांचे मित्र आणि जवळच्या व्यक्तींना प्रमोट करताना दिसतात. आणि माझ्यापेक्षा बाकीच्यांना देखील चांगलेच माहिती आहे की, हे पुरस्कार सोहळे कसे असतात, फार तर माझा आणखी एक दिवस जाईल की, आम्ही कबीर सिंग आणि ॲनिमलच्या वेळेस काय सहन केले आहे ते....

तुमच्याकडे असणाऱ्या कॅमेऱ्यामधील मेमरी संपून जाईल पण माझे बोलणे संपणार नाही. पण मी एक सांगतो की, मी बोलत राहीन. माझ्याकडे सांगण्यासारखे खूप काही आहे. पण मी काही लहान मुलांसारखे रडत नाही. मी तक्रार करतो आहे असे मला काही सांगायचे नाही. यावेळी संदीपनं त्याच्या चित्रपटाला ज्यांनी नावं ठेवली त्या समीक्षकांना अशिक्षित असे म्हटले आहे.

Sandeep Reddy Vanga unhappy even after 19 Filmfare nominations
Animal Movie Offer: 'अ‍ॅनिमल'च्या मेकर्सची मोठी ऑफर! आता सिनेमाचा आनंद घ्या फक्त 'इतक्या' रुपयांमध्ये

मला फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे अनुभव आले आहे ते पाहून मी गप्प राहतो. संदीपच्या चित्रपटाला १९ नामांकन मिळून देखील खूश नाही. त्यावर त्यानं इंडस्ट्रीतील राजकारणाविषयी प्रतिक्रिया दिली आहे. ॲनिमलवरुन गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळया प्रकारचा वाद होत असून त्या चित्रपटातून महिलांप्रती असंवेदनशीलतेचा संदेश गेल्याचे अनेकांनी म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.