Marathi Drama Kirkol Navre: किरकोळ भांडण तर खुप पाहिली असणार आता पहा 'किरकोळ नवरे'!

अनिता दाते,सागर देशमुख, पुष्करराज चिरपुटकर त्रिकूटाचं धमाल नाटक प्रेक्षकांच्या भेटीला...
Marathi Drama Kirkol Navre
Marathi Drama Kirkol Navre Esakal
Updated on

Marathi Drama Kirkol Navre: ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मराठी मालिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ही मालिका आजही तितकीच लोकप्रिय देखील आहे. या मालिकेतील राधिका ची व्यक्तिरेखा अभिनेत्री अनिता दाते हिनं साकारली होती. या मालिकेतून ती घराघरात प्रसिद्ध झाली. सध्या अनिता दाते ही 'नवा गडी नवा राज्य' या मालिकेतुन प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आता पुन्हा राधिका म्हणजेच अनिताची चर्चा रंगमंचावर रंगणार आहे.

Marathi Drama Kirkol Navre
Prajakta Mali Birthday : 'आज बिल्डिंगमध्ये फरसाण...' सईनं दिल्या प्राजूला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपल्या खमक्या स्वभावाने नवऱ्याला ठिकाण्यावर आणणारी राधिका म्हणजे अभिनेत्री अनिता दाते ही आता किरकोळ नवऱ्यांचा शोध घेत आहे. ती किरकोळ नवरे का शोधतेय? ती त्याचं काय करणार अशा अनेक प्रश्नाची उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला ११ ऑगस्टला रंगभूमीवर येणारं किरकोळ नवरे हे नवं नाटक बघावं लागेल.

या नाटकाची टॅगलाईनच तुम्हाला या नाटकाबद्दल भरपुर सांगून जाते. 'हसून हसून दमछाक करणार डामचिक नाटक' ही या नाटकाची टॅगलाईन आहे. या नाटकात राधिकेच्या भुमिकेच अभिनेत्री अनिता दाते दिसणार तर तिच्यासोबत सागर देशमुख, पुष्करराज चिरपुटकर दिसणार आहेत. या नाटकाची निर्मिती अनामिका + युवांजनी नाटक मंडळीने केली आहे. तर साईसाक्षी प्रकाशित या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन सागर देशमुख यांनी केलं आहे.

Marathi Drama Kirkol Navre
Asha Bhosle Tweet : 'काहीही विसरलेले नाही, लक्षात ठेवा या इंडस्ट्रीची मी शेवटची मुघल!'

नाटकाच्या कलाकारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज वर तिघांनीही आजवर वेगवेगळया भूमिकांमधून त्याच्या अभिनयाची चुटूक दाखवली आहे. आता एकत्र येत हे तिघे काय धमाल करतील ते तर नाटक पाहिल्यावरच कळेल.

किरकोळ नवरे या नाटकाबद्दल बोलतांना तिन्ही कलाकार म्हणतात की, मनोरंजनातून अंजन घालणारे हे नाटक करताना आम्ही खूप मजा करतोय. प्रेक्षकही हे नाटक तितकचं एन्जॉय करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Marathi Drama Kirkol Navre
Sunny Deol On Trolls: सकीनाला बोलताच तारा सिंगचा भडका! 'तुम्ही सगळे रिकामटेकडे...'

नाटकाच्या थीमवर बोलायचं झाल्यास हे किरकोळ नवरे हे विनोदी नाटक तर आहेच मात्र नवरा बायकोच्या नात्याबद्दल आणि त्या नात्यातली असुरक्षितता आणि चिरंतर प्रेमाबद्दलही खुप काही सांगुन जाणार आहे.

या नाटकाचे निर्माते अभिजीत देशपांडे, राहुल कर्णिक, दिनू पेडणेकर आहेत. दिग्दर्शन सहाय्य कल्पेश समेळ तर नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे आहे. संगीत सौरभ भालेराव यांचे असून गीते जितेंद्र जोशी यांनी लिहिली आहेत.

प्रकाशयोजना विक्रांत ठकार तर वेशभूषा सोनल खराडे यांची आहे. आता या नाटकाच्या माध्यामातुन प्रेक्षकांच भरपुर मनोरंजन होणार असल्याचं दिसतयं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.