Anjali Arora MMS: सोशल मीडिया स्टार अंजली अरोराला कंगना रनौत(Kangana ranut)च्या लॉकअप शो मुळे जास्त फेम मिळालं. शो मध्ये कॉमेडियन मुनव्वर फारुकीसोबतची तिची केमिस्ट्री लोकांना भलतीच आवडली होती. अंजली अरोरा हे नाव वादात सापडल्याचं दिसून आलं ते तिच्या नावानं व्हायरलं झालेल्या एका एमएमएस मुळे. अंजली अरोरानं आता यावर चुप्पी तोडली आहे.(Anjali Arora break silence over viral mms video)
कंगना रनौतच्या लॉकअप शो मध्ये सहभागी झाल्यानंतर अंजली अरोराच्या फॅन फॉलॉइंगमध्ये कमालीची वाढ झाली आहे. अंजलीचं 'सैंया दिल में आना रे' हे गाणं सध्या व्हायरल होताना दिसत आहे, गाणं रिलीज झालं तसं लगेचच अंजली वादात सापडली. सोशल मीडियावर एक व्हिडीओ एका मेसेजसोबत व्हायरल झाला,ज्यात लिहिलं होतं,'अंजली का एमएमएस'
आता अंजलीनं या पूर्ण प्रकरणावर चुप्पी तोडत व्हायरल व्हिडीओ करणाऱ्यांना प्रश्न विचारला आहे. ती म्हणाली आहे, ''जर तुमच्या कुटुंबातील कोणत्या सदस्यासोबत असं घडलं असतं तर तुम्हाला कसं वाटलं असतं?''
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंजली त्या कथित व्हायरल व्हिडीओवर बोलताना भावूक झालेली दिसत आहे. तिनं म्हटलं आहे,''असं पहिल्यांदाच घडलेलं नाही,याआधी देखील मी या सगळ्याचा सामना केला आहे. यासंदर्भात माझ्या पालकांनी पोलिस तक्रारही केली होती. मला माहित नाही हे लोक असं का करतात. माझा फोटो वापरुन,माझं नाव घेत ,हा अंजली अरोराचा एमएमएस आहे,हीच आहे ती. मला कळतच नाही हे असं का करतायत. याच लोकांनी तर मला मोठं केलं आहे ना. यांचे देखील कुटुंब असेल.'' आणि अंजली अक्षरशः त्या मुलाखतीत रडली आहे.
पुढे अंजली म्हणाली, ''ज्या व्हिडीओत मी नाही, त्याला माझ्या नावानं व्हायरल केलं जात आहे. युट्युबवरील व्ह्यूजसाठी असं गलिच्छ काम केलं जात आहे. एका मुलीला बदनाम केलं जात आहे. ही कोणती मानसिकता आहे. माझंही कुटुंब आहे,माझे भाऊ-बहिण आहेत. माझी लहान भावंड हे सगळं पाहतात त्यांना कसं वाटत असेल''.
अंजली म्हणाली, ''हे पहिल्यांदा घडलेलं नाही. लॉकअप शो मधून जेव्हा मी बाहेर आली तेव्हा कळलं की आधीपासूनच हे सुरु आहे. मी शो मध्ये असताना जेव्हा हे घडलं होतं तेव्हा माझ्या आई-वडीलांनी तक्रारही केली होती. माझा चेहरा वापरुन फेक व्हि़डीओज व्हायरल केले जात होते. लोकांनी मला प्रेम दिलं,पाठिंबा दिला मग तेच लोक असं का करत आहेत माझ्यासोबत? असं काही करण्याआधी लोक विचार नाही करत त्या व्यक्तीचा,त्याच्या कुटुंबाचा. मी फक्त २१ वर्षांची आहे. हे सगळं मी सहन नाही करु शकत''.
''मला वाटतं की हे सगळं नॉर्मल झालं आहे लोकांसाठी. कोणाचाही फोटो घ्या,एडिट करा आणि व्हायरल करा. लोकांना यात आनंद वाटतो. आणि यावर मजा घेत चर्चा करणारे तर सुपर कूल लोक आहेत. माणुसकी संपली आहे जगात असं वाटत आहे''.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.