Ankita Lokhande Pregnancy Rumors: अंकिताची 'गूडन्यूज' आहे? प्रेग्नेंसीच्या चर्चांना उधाण येताच स्वत:च केला खुलासा!

Ankita Lokhande Reacts To Pregnancy Rumors
Ankita Lokhande Reacts To Pregnancy Rumors
Updated on

Ankita Lokhande Reacts To Pregnancy Rumors: प्रसिद्ध टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे ही नेहमीच दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. काही दिवासांपुर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले. यामुळे ती पुर्णपणे खचली होती. मात्र आता ती हळू हळू त्या धक्यातून बाहेर येत आहे. अंकिता सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिच्या फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर चाहत्यांसोबत संपर्कात असते. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून तिच्या गरोदरपणाच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. तिचे बरेच फोटो सोशल मीडियावर तिच्या बेबी बंप दिसत असणारे बरेच फोटोही व्हायरल होत होते.

खर तर अंकिताचे एडिट केलेले फोटो व्हायरल होत आहेत, या फोटोंनंतर अंकिता लोखंडे गरोदर असल्याच्या अफवा पसरु लागल्या. आता या प्रकरणावर बरिच चर्चा झाल्यानंतर अखेर फेक फोटो आणि प्रेग्नेंसीच्या बातम्यांवर अंकिताने मौन सोडलं आहे.

Ankita Lokhande Reacts To Pregnancy Rumors
Jawan ने चोरले 'आम आदमी पार्टी'चे डायलॉग? केजरीवालांच्या भाषणाशी तुलना; 'आप'चे ट्वीट व्हायरल

या व्हायलर होत असेलेल्या फोटोंमध्ये अंकिता आणि तिचा पती विकी दिसत आहे. यावेळी तिच्या फोटोंसोबत छेडछाड करत तिला बेबी बंप दाखवण्यासाठी नेटकऱ्यांनी हा फोटो एडिट केले होते. यानंतर गर्भधारणेच्या अफवा वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या.

या चर्चांवर अंकिताने प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली की, 'मला वाटतं की मी एकटीच अशी अभिनेत्री नाही जिच्यासोबत हा सर्व घडला आहे. जेव्हा तुमचं लग्न झालेलं नसतं तेव्हा लोक तुम्हाला लग्नाच्या प्रश्नाबाबत विचारतात आणि जेव्हा तुम्ही लग्न करता तेव्हा ते मुलांबद्दल विचारतात.

ते विचारतात मूल होणार आहे नाही होत आहे. तू गरोदर आहेस का? अशा गोष्टी लिहिल्या जातात आणि विचारल्या जातात. माझं लग्न झाल्यावर अनेकांनी माझ्या घटस्फोटाबाबत सुद्धा चर्चा सुरु केली. या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही आणि मला त्याचा फरकही पडत नाही.”

Ankita Lokhande Reacts To Pregnancy Rumors
Akshay kumar In Mahakal: वाढदिवसानिमित्त अक्षय सहकुटुंब पोहचला महाकाल दरबारात! क्रिकेटर शिखर धवनचीही हजेरी

बेबी बंप असलेले स्वतःचे खोटे फोटो स्वतःवर बनवलेले मीम्स देखील तिने पाहिलेले आहेत. या बातम्यांनी तिला वाईट वाटत नाही उलट हसायला येते. पुढे अंकिता म्हणाली की, तिला गरोदरपणाची घाई नाही. जेव्हा ते व्हायचे आहे ते होईल. सर्व काही नशिबावर अवलंबून आहे.

Ankita Lokhande Reacts To Pregnancy Rumors
Akshay kumar In Mahakal: वाढदिवसानिमित्त अक्षय सहकुटुंब पोहचला महाकाल दरबारात! क्रिकेटर शिखर धवनचीही हजेरी

अंकिता लोखंडेने 14 डिसेंबर 2021 रोजी बिझनेसमन विक्की जैनसोबत लग्न केले, तेव्हापासून तिच्या गरोदरपणाच्या बातम्या सतत समोर येत आहेत. अभिनेत्रीने यावर आपले मौन सोडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.