Annapoorani Controversy News: मुंबईत गुरुवारी सकाळी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलंय.
नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या 'अन्नपूर्णी' या चित्रपटातील भगवान राम यांच्याविरोधातील वादग्रस्त संवादांवरून जोरदार निदर्शने करण्यात आली.
विश्व हिंदू परिषदेच्या सदस्यांनी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत नेटफ्लिक्सवरुन चित्रपट काढण्याची मागणी केली.
(Annapoorani Controversy Vishwa Hindu Parishad Aggressive Raises Flags In Mumbai Against)
इंटरनेटवर अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. विश्व हिंदू परिषदेचे सदस्य त्यांच्या पक्षाचे झेंडे फडकवताना आणि नयनतारा स्टारर 'अन्नपूर्णी'वर बहिष्कार घालण्याची मागणी करताना दिसतात. या कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
"भगवान श्रीराम हे देखील मांस खाणारे होते" असा एक डायलॉग सिनेमात वापरण्यात आला आहे. या डायलॉगविरोधात 'अन्नपूर्णी'च्या निर्मात्यांना एक निवेदन जारी केलंय, हे दृश्य जोवर सिनेमातून डिलीट करण्यात येणार नाही तोवर सिनेमा नेटफ्लिक्सवरुन काढण्यात यावा, अशी मागणी करण्यात आलीय.
"हिंदू आणि ब्राह्मण समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा चित्रपटाचा सह-निर्माता म्हणून आमचा कोणताही हेतू नाही. आणि याद्वारे संबंधित समुदायाच्या भावना दुखावल्या आणि झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करू इच्छितो," असे 'अन्नपूर्णी'च्या निर्मात्यांनी निवेदनात म्हटले आहे.
अन्नपूर्णी सिनेमा सध्या नेटफ्लिक्सवर पाहायला मिळतोय. सध्या सिनेमाविरोधात जबलपूर, मुंबईत FIR दाखल करण्यात आलाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.