अर्जुन कपूर(Arjun Kapoor)ला एक सख्खी छोटी बहिण आहे,जिचं नाव आहे अंशुला कपूर(Anshula Kapoor). दोघे भाऊ-बहिण अगदी खात्या-पित्या घरची हट्टी-कट्टी मुलं म्हणून काही वर्षांपूर्वी ओळखली जायची. पण पुढे अर्जुन कपूरनं बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आणि स्वतःला एकदम परफेक्ट हिरोच्या शेपमध्ये फीट बसवलं. आता भाऊ फीट झाला तरी छोटी बहिण अंशुला मात्र अगदी गेल्या वर्षभरापर्यंत चांगलीच हेल्दी होती. पण आता अचानक तिचा एक फोटो व्हायरल झाला आणि तिचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या. कपूरांची ही कन्या देखील बॉलीवूडमध्ये येतेय की काय अशी चर्चा रंगू लागली आहे. असो,ते पुढचं पुढे. पण अंशुलानं एवढा स्वतःमध्ये बदल कसा घडवून आणला याविषयी नुकतेच ती उघडपणे बोलली आहे.
अंशुला कपूरनं नुकतंच आपल्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनविषयी भाष्य केलंय. ती म्हणाली आहे,''हा प्रवास खूप कठीण होता''. अश्रू,भीती,दडपण,न्यूनगंड अशा सगळ्यांवर मात करुन मी इथवरचा यशस्वी प्रवास केल्याचं तिनं सांगितलं आहे. अंशुलाच्या या वजन कमी करण्याच्या हिमतीला दाद देत तिच्यावर तिचे कुटुंबिय,मित्रमैत्रिणी आणि शुभचिंतकांनी स्तुतीसुमनं उधळली आहेत. तिच्या या संपूर्ण प्रवासात बहिण जान्हवी कपूर,चुलत बहिण शनाया कपूर आणि ट्रेनर्सनी खूप मानसिक आधार दिल्याचं तिने सांगितलं आहे.
तिनं स्वतःसाठीच एक नोट लिहिलीय. आणि पोस्टच्या माध्यमातनं ती सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिनं लिहिलंय,''नोट टू सेल्फ-चला,आज स्वतःविषयी थोडं चांगलं लिहिते. मला आरशात पाहिल्यावर मी कशी दिसते यापेक्षा महत्त्वाचं वाटतं की मी हेल्दी आहे. आणि हेल्दी म्हणजे फक्त मी जे खाते त्याच्यापेक्षा माझ्या डोक्यात येणारे विचार हेल्दी आहेत नं,सकारात्मक आहेत नं याला अधिक महत्त्व देण्याचा प्रयत्न मी करते. मी त्यासाठी प्रयत्न केले. सुरुवातीला ते कठीण वाटलं. पण प्रयत्नानं शक्य करुन दाखवलं. मनाचं आरोग्य उत्तम ठेवणं अशक्य होतं माझ्यासाठी. खूप कष्ट घ्यावे लागले. खूप रडले. खूप अस्थिरता जाणवली अनेकदा. खूप भीतीही वाटली जमेल का नाही यासाठी. स्वतःविषयीचा न्यूनगंड आणि चुकीच्या समजूती या सगळ्यावर मात करण्यासाठी खूपच मेहनत घेतली. आणि तेव्हा कुठे खऱ्या प्रवासाला सुरुवात झाली. स्वतःच्या अस्तित्वाची,स्वःत्वाची नव्याने ओळख झाली''.
''दोन वर्ष,मोठा कालखंड होता तो. आणि अजूनही मी त्यावर मेहनत घेतेय. मला खूप वेळ लागला माझ्या बॉडी शेमिंगवर मात करण्यासाठी. केवळ शारिरीक नाही तर मानसिकदृष्टया खंबीर होण्यासाठी मला झटावं लागलं स्वतःशीच. स्वतःच्या कमीपणावर मात करुन पुढे जाणं कठीण असतं ज्याचा अनुभव मी घेतला. आयुष्य छोटं आहे,आणि त्यातही आपण आपले गुणदोष उगाळत बसलो तर ते आनंदात जगणार कधी. मी आता माझ्यात जे नाहीय त्याचा विचार न करता जे आहे त्यावर प्रेम करत जगायला शिकले,शिकतेय''.
अंशुलाच्या या पोस्टवर जान्हवी कपूरनं पोस्ट करत लिहिलंय,''Omg honey''आणि खुप सारे फायर आयकॉनही तिनं कमेंट बॉक्समध्ये पोस्ट केलेयत. तर दुसरीकडे हुमा कुरेशीनं कमेंटबॉक्समध्ये अंशुलाला 'सेक्सी' म्हटलंय. शनाया कपूर आणि महीप कपूर यांनी खूप सारे हार्ट आयकॉन पोस्ट केलेयत. अंशुलाचा फिटनेस ट्रेनर स्वप्नील हजारेनं देखील तिच्या पोस्टवर लिहिलंय,''तुझ्यातला हा नवीन बदल आवडला मला''. प्रियंका चोप्रानंही तिची प्रशंसा करणारी कमेंट दिली आहे. '' तू खरंच प्रोत्साहन देशील अनेकांना'' असं प्रियंकानं म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.